Home Social एस.टी.ची सवलत बंद होणार असल्याची अधिकृत माहिती नाही :- आशिष बाहुलकर…

एस.टी.ची सवलत बंद होणार असल्याची अधिकृत माहिती नाही :- आशिष बाहुलकर…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- प्रवाशी वर्ग व विशेषतः महिलांना एस. टी. सवलत बंद होणार असल्याची माहिती सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

          एस. टी. ची सवलत बंद होणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्यापपर्यंत प्राप्त झाली नसल्याची माहिती दर्यापूर आगाराचे आगार व्यवस्थापक आशिष बाहुलकर यांनी दिली असून गर्दीची वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दर्यापूरात आणखी चार ठिकाणी नोंदणीकरण शाखा लवकरच सुरु होण्याची प्रक्रिया सुरु असून त्या सुरु झाल्यावर तिथेही नोंदणीकरण करता येईल.

        नोंदणीकरण शांततेने करुन घ्यावे असे आवाहन नागरिकांना आगार व्यवस्थापक आशिष बाहुलकर यांनी केले आहे.