स्वच्छता ही सेवा,”एक तारीख एक तास श्रमदानं करून, ११३ बटालियन ने केला ग्रामीण रुग्णालयचा परिसर स्वच्छ… 

भाविक करमनकर 

धानोरा प्रतिनिधी

       “स्वच्छता ही सेवा,मोहीम संपूर्ण भारतभर दहा वाजता पासून ते अकरा वाजेपर्यंत एक तास श्रमदान करून यशस्वी करण्यात आली. 

          113 बटालियन सीआरपीएफचे कमांडर जसवीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील आजूबाजूच्या परिसरत मोठ्या प्रमाणात श्रमदान करून कचरा गोळा करण्यात आला.

           या श्रमदानात 113 बटालियनचे जवान,पोलीस,ग्रामीण रुग्णालय धानोराचे कर्मचारी,जिल्हा परिषद व जुनिअर कॉलेज धानोरा,उच्च प्राथमिक केंद्र शाळा,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय,चाइल्ड प्रोग्रेस कॉन्व्हेंट,चिल्ड्रन पॅराडाईज कॉन्व्हेंट व गावातील नागरिक यांच्या सहभागाने ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला.

          या कार्यक्रमा दरम्यान 113 बटालियनचे कमांडर जसवीर सिंग यांनी मार्गदर्शन करताना उघड्यावर कचरा टाकू नये,प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये,उघड्यावर सौच करू नये,बीडी,सिगारेट धूम्रपान व तंबाखू यांच्या सेवनाने मानवाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती दिली.

            आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाला सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरित केले.यावेळी 113 बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी हरिशंकर तिवारी निरी /जीडी रश्मिकांत राऊत 113 बटालियन सीआरपीएफ ग्रामीण रुग्णालय धानोराचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश गजबे,व्ही.एम.सुरजुसे, मुख्याध्यापक,व्ही.के.शेडमाके मुख्याध्यापिका,प्रवीण यलसलवार मुख्याध्यापक,पोलीस निरीक्षक गौरव गावंडे व ग्रामस्थ आणि विध्यार्थी यांची उपस्थिती होती.

         या कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन श्रमदान केले व रुग्णालय परिसरात गोळा झालेला कचरा साफ करून या परिसराला सुंदर रूप देण्यात आले.

        स्वच्छता ही सेवा कार्यक्रम केल्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश गजबे व धानोरा ग्रामवासी यांनी कमांडंट सिंग 113 बटालियन सीआरपीएफ यांचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या शेवटी 113 बटालियन कडून सर्वांना जलपणाची व्यवस्था करण्यात आली.