उमेश कांबळे
ता.प्र.भद्रावती
विदर्भात महत्वाच नगदी असलेलं सोयाबीन हे पीक अति पावसामुळे व मोझाक या रोगामुळे पिवळे पडून समूळ नष्ट झाल्याने शेतकरी असाहाय्य झाले आहेत.
अशा नैसर्गिक संकट परिस्थितीत शासन स्तरावरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदतीच्या संदर्भात कुठल्याही हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किशोर टोंगे मैदानात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी अस्वस्थ असून काही ठिकाणी आत्महत्याग्रस्त झाले आहे.या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि कृषी मंत्री यांना निवेदन सादर केले.मात्र,पश्चिम महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी तातडीने बैठका घेऊन अनुदान देणार आहे.
मात्र सरकार आमच्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कुठल्याही बाबतीत संवेदनशील दिसत नाही.त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसह लक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करीत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
सोयाबीन शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर असून शासनाचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने हे आंदोलन करण्यात येणार असून सर्वपक्षीय नेत्यांनी देखील सहभागी व्हावे व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.