दुर्गापूर ग्रामपंचायत तर्फे निघाली कलश यात्रा..

भाविक करमनकर 

धानोरा प्रतिनिधी

       पंचायत समिती धानोरा अंतर्गत दुर्गापूर ग्रामपंचायत तर्फे दिनांक २६/०९/२०२३ ला अमृत कलश यात्रा काढण्यात आली.

        यावेळी गावातील फेरी अंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडून मूठ भर माती व भूमिहीन कुटुंबाकडून तांदूळ गोळा करण्यात आले.तसेच दिनांक १७/०३/२०२३ पासुन गावात श्रमदानं करण्यात आले ते 2 ऑक्टोबर पर्यंत चालु राहील.

             सदर कलश यात्रेला गावातील नागरिक,महिला बचत गट,युवक,युवती यांनी सहकार्य केले.या कलश यात्रेत ग्रामपंचायत च्या माजी सरपंच ललिता बेसरा, यशोदा टेकाम,विकास कोरचा, सचिव एम.बी.डोहे,मुख्याध्यापक डोंगरे सर,शिक्षक पवार सर, कुलसंगे सर,मंगला कुळमेथे, महेश बेसरा,आशा वर्कर बघेल ताई,अंगणवाडी सेविका,युवक युवती,शाळेतील विध्यार्थी सहभागी झाले होते.