प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भारत मुक्ती मोर्चा-राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा द्वारे भारत देशात,”ईव्हीएम मशीन,सह इतर विषयातंर्गत,भारत बंदचे करण्यात आलेले जनआंदोलन आज १ जुलै २०२५ रोजी मंगळवारला शांततेत पार पडले…
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे ईव्हीएम मशीन च्या विरोधात कायदेशीर व आंदोलनातंर्गत लढाई लढत आहेत आणि भारत देशातील मुलनिवासी नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी सातत्याने सर्व प्रकारचा आवश्यक संघर्ष करीत आहेत.
भारत मुक्ती मोर्चा,राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाचे नेतृत्व करताना दिर्घकाळ संघर्षाचा कार्यकाळ असला तरी भारत देशातील मुलनिवासी नागरिकांच्या अधिकारांची व मुलभूत हक्कांची व त्यांच्या खऱ्या स्वातंत्र्यांची लढाई जिकरीने,हिमतीने, आत्मविश्वासाने,निष्ठेंने, ध्येयवादाने,योग्त नितीने आणि इतिहासीक तथा आवश्यक विचारधारेला अनुसरून लढावी लागतय.
भारत देशातील नागरिकांच्या विरोधातील मनुवादी विचारसरणीचा व मुनुवादाला अनुसरून ब्राह्मण वादी विचारांचा उलगडा करणे आणि या उलगड्या अंतर्गत भारतातील सर्व मुलनिवांसीसाठी वैचारिक लढा लढणे व तात्विक संघर्ष करणे कठीणातले कठीण कार्य आहे.
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून भारत देशातील मुलनिवासी म्हणजेच बहुजन समाजातील (ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्यांक-आणि इतर ) नागरिकांसाठी कायदेशीर आणि हक्काचा संघर्ष करीत आहेत..
या देशातील बहुजन समाज घटकांतील नागरिक म्हणजे मुलनिवासी नागरिकांच्या विरोधात भारत सरकार,भारत देशातील राज्य सरकारे,आणि स्वायत्त संस्था,प्रशासन,”कामे व कार्य करतात,याची वामन मेश्राम यांना सर्व प्रकारची माहिती आहे..
भारत देशांतर्गत ईव्हीएम मशीनमुळे होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुका मुलनिवासी नागरिकांचे हक्क हिरावून घेत आहेत आणि त्यांना भांडवलशाही व खाजगीकरणातंर्गत परावलंबी बनवित आहेत.त्यांच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण करीत आहेत…
भारत देशांतर्गत मुलनिवासी नागरिकांच्या विरोधातील आरएसएस व मनुवादी विचार सरणीचे सरकारे यांच्या कार्यपद्धती व त्यांच्या महत्त्वपूर्ण वैचारिक बाबी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी ओळखले आहे….
ईव्हीएम मशीन द्वारे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मते चोरण्याचे कामे होत असल्याने बेकायदेशीरपणे बेजबाबदार अशा लोकप्रतिनिधींना लोकसभेत आणि विधानसभेत ईव्हीएम मशीन द्वारे निवडून पाठविले जात असल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या पुराव्यानिशी लक्षात आले आहे..
म्हणूनच त्यांनी ईव्हीएम मशीन विरोधात व इतर विषयांना अनुसरून आज भारत बंद ची हाक दिली होती.
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आवाहनाला सकारात्मक घेत भारत देशातील भारत मुक्ती मोर्चाच्या,राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी देशभरात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन यशस्वी केल्याचे दिसून आले आहे.
भारत बंद चे खालील छायाचित्रे…







