छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती संपन्न.

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

       छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना व अर्थशात्र विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने सामाजिक समता सप्ताह ८ ते १४ एप्रिल तसेच शुक्रवार दिनांक १४ एप्रिल २०२३ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३2 जयंती कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.भारत कल्याणकर हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी

राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक न्यायासंदर्भात विस्तृत आढावा कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.भारत कल्याणकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना निर्मिती संदर्भात घेतलेली दक्षता व त्यातील स्वातंत्र्य समता व बंधुत्व यावर विस्तृत प्रकाश टाकला त्याच प्रमाणे प्रमुख पाहुणे प्रा. विपीन लिल्हारे यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवणार प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अभ्यासू वृत्ती विद्यार्थ्यांनी जोपासावी हा संदेश या जयंतीनिमित्त दिला.

 या कार्यक्रमाला महाविद्यालय प्राध्यापक डॉ. रवींद्र इचे, डॉ. प्रवीण सदार, डॉ. हरिष काळे श्री. वानखडे सर, संजय सोळंके रासेयो चे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन रोहिणी मानकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्नेहा नवले केले.

 अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला