तक्षशिला बुद्ध विहार,”हिवरा येथे, युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा उत्साहात पार पडला जयंती कार्यक्रम. 

 

तालुका प्रतिनिधी

   चिमूर   

      चिमूर तालुक्यातंर्गत मौजा हिवरा येथे युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

                 कार्यक्रमाचे ग्रामपंचायत हिवरा येथील सरपंच दुर्यधन लाखे हे कार्यक्रमचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समता सैनिक दलाच्या हिवरा शाखा अध्यक्षा प्रेरणा प्रशांत सावाईमुन,प्रा.ज्ञानेश्वर ठवरे भिसी,येरखेडाचे माजी सरपंच तथा बसपाचे माजी चंद्रपूर जिल्हा प्रभारी धर्मदास गेडाम,शुभम मंडपे ग्रा. प. सदस्य आंबोली,बंसोड सर गडपिपरी,वैभव ठाकरे ग्रां. प . उपसरपंच आंबोली,उद्धव मोहोड,उध्दव खाडे हे होते.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध जिवन कार्यावर प्रकाश टाकला.

      आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश सवाईमुन यांनी केले तर प्रास्ताविक सीमा गायकवाड यांनी केले.याचबरोबर आभार प्रदर्शन प्रशिक सावईमुन यांनी केले.