उपविभागीय अभियंता दुर्लक्ष का म्हणून करतात? — शंकरपूर ते कान्पा रस्त्याची दैनावस्था…

दिक्षा ललीता देवानंद कऱ्हाडे                                           वृत्त संपादिका                                                      दखल न्यूज भारत

      चिमूर-जांभुळघाट-शकरपूर ते कान्पा मार्ग दैनंदिन भरगच्च दळणवळणाचा..या राज्य महामार्गावर दररोज धावणाऱ्या वाहनांची संख्या असंख्य असते.असे असताना या रस्त्याच्या डागडुजीकडे चिमूरचे सार्वजनिक बांधकाम उपविभागिय अभियंता दुर्लक्ष का म्हणून करतात?हेच कळायला मार्ग नाही.

                   या रस्त्याच्या डागडुजीसाठी अनेकदा अर्ज केल्यानंतर सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागिय अभियंता हे शंकरपूर ते कान्पा रस्त्याच्या डागडुजीकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांच्या असंवेदनशील कर्तव्याचा पाढा वरिष्ठांकडे वाचायचा काय?हा यक्ष प्रश्न या राज्य महामार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना पडला आहे..

            शंकरपूर ते कान्पा राज्य महामार्गावर खड्यांचे साम्राज्य झाले आहे.यामुळे खड्याच्या डागडुजीकडे लक्ष वेधण्याकरीता आज या मार्गावर बेशरमचे झाडे लावून परिसरातील शेकडो नागरिकांनी चिमूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागिय अभियंता यांचा तिव्र भावनांनी निषेध नोंदवला.