प्रेम संबंधच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर केला लैंगिंक अत्याचार… — आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल… — अत्याचारातंर्गत मुलगी गर्भवती…

 

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि

दखल न्यूज़ भारत

 

सिंदेवाही- एका अल्पवयीन मुली सोबत बळजबरिने २४ वर्षीय मुलाने लैंगिंक संबंध केले होते.सदर मुलीची प्रकृती बिघडल्याने ती रुग्णालयात गेली असता,गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी यांची माहीती पोलीस विभागाला दिली.त्यावरून लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले.

         सविस्तर वृत्त असे की, सिंदेवाही येथील शुभम पुरुषोत्तम नागोसे वय २४ याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध होते.प्रेम संबंधाच्या नावाखाली या मुलाने मूली सोबत काही महिन्याआधी बळजबरिने लैंगिक संबंध केले होते.

           लैंगिक संबंध केल्याची माहिती कोणालाही सांगू नको अन्यथा मी तुझी बदनामी करणार अशी धमकी ही मुलाने त्या मुलीला दिल्याने,भयभीत मुलींनी याची माहीती घराच्यांना अजिबात दिली नव्हती.

              २-४ दिवसा आधी मुलीची तबियत बरी नसल्याने तिच्या वडिलांनी तिला एका खाजगी रुग्णालयात नेले असता,तेथील डॉक्टरांना मुलगी गरोदर असल्याचे लक्षात आले.डॉक्टरांनी याची माहिती पोलीस विभागाला दिली.

             पोलिसांच्या चौकशीत व मुलीने दिलेल्या बयानानुसार (तक्रार) पोलिसांनी सिंदेवाही येथील शुभम पुरुषोत्तम नागोसे विरुद्ध कलम 376,376(2),(N),(506),भा.द.वी,46,पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक केली.

          न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठड़ी सुनावली आहे.पुढील तपास सिंदेवाहीचे ठानेदार तुषार चव्हाण करीत आहे.