कारण………
इंग्लंडप्रमाणे संसदीय लोकशाही आम्हांला परवडणारी नाही,
धार्मिक कर्मकांडाने आणि कोरड्या अहंकाराने संसदीय लोकशाहीत विभूतीपूजेचे आणि व्यक्तीपूजेचे पीक जोमाने येते. विरोधी पक्ष मजबूत होत नाही. ज्या देशातील नागरिकांवर धर्माचा ( कोणत्याही अंधश्रद्धाळू ) पगडा असेल, त्या देशातील राजकीय सत्ता एकाधिकारशाहीकडे झुकते.
अशा देशातील लोकशाही लाचार होऊन केवळ निवडणूकिपूरती एका दिवसाची देखाव्यासाठी जिवंत असल्याचा भास होतो. अशा देशात कितीही महापुरुष / तत्ववेत्ते होऊन गेले तरी काहीही फरक पडत नाही. कारण त्या देशातील बुद्धीजीवी वर्ग नपुसंक झालेला असतो. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि माध्यमे या संविधानिक संस्था सुद्धा केवळ जुन्या बुरुजांच्या ढासळलेल्या भिंतीसारख्या अर्धवट उभ्या दिसतात.
असा हा आमचा भारत देश……….!
4000 वर्षाचा इतिहासच आमच्या कुसांस्कृतिक गुलामीचा आहे. मूळ सिंधू सुसंस्कृतीचा काळ प्रगल्भ होता. परंतू या बाहेरून आलेल्या कुसंस्कृतीच्या आर्यानी येथील लोकशाहीवादी, समतावादी सुसंस्कृतीला संपवून आपली विषमतावादी कुसंस्कृती साम, दाम, दंड आणि भेदावर आधारित असलेली कूटनीतीचाच वापर करून आपल्याला गुलाम बनवले. आपणही फुटकळ स्वार्थापुढे लाचार होऊन अलगद त्यांच्या हड्डीला बळी पडलो. आम्हांला फुटकळ स्वार्थापुढे महापुरुषांच्या त्याग, संघर्षाची अर्थात क्रांतीची किंमत कमीच वाटू लागली. नव्हे तर प्रतिमा आणि पुतळ्यापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आम्ही स्वतःला धन्य मानू लागलो.
माझ्याएवढे अर्थात आमच्याएवढे कूसांस्कृतिक गुलामीचे खांदेकरी कुणीच नाही, याचा गर्वच आमच्यात चढला.
परिणामी अवघ्या 75 वर्षात आमची लोकशाही आम्हीच संपवली…..!
परंतू , ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेकरांसाठी स्वतःचं रक्त सांडवलं……..
त्यांचीच आजची 2026 मधली आक्रमक युवापिढी राजकीय लाचारी बाजूला फेकून जी जी वृत्ती लोकशाही आणि संविधानाला आड येते, तीला कायमचे मुळासहित उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही. कारण बौध्द हा धर्म नसून तो तो डोळस, विज्ञानवादी आणि जागृत धम्म आहे. त्याची अनेक उदाहरणे देता येतील त्यापैकी एक उदाहरण म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीने इंटरनेटवर आणि समाजमाध्यमावर भाजपच्याही ( ज्याचे आजपर्यंत सर्वात जास्त फॉलोअर्स होते ) पुढे जाऊन फॉलोअर्स बनवले. हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
शेवटी एकच सत्य होईल की महापुरुषांचे डोळस कट्टर अनुयायीच या देशाचे , लोकशाहीचे आणि संविधानाचे रक्षण करतील. ती सुद्धा युवापिढीच……..!
त्यामध्ये मी प्रथम पुढेच असेल. कारण संविधानाने मला गुलाम नव्हे तर या देशाचा मालक बनवले…..
तुम्ही…….???


