Home Breaking News ब्रेकिंग न्यूज.. — विहिरीत उडी मारुन केली आत्महत्या… — महिला...

ब्रेकिंग न्यूज.. — विहिरीत उडी मारुन केली आत्महत्या… — महिला अनभिज्ञ!

दिक्षा कऱ्हाडे

  वृत्त संपादिका

     नेरी ते सावरगावला जाणाऱ्या मार्गाजवळील श्री.रामकृष्ण लाभे यांच्या शेतातील विहिरीत अनोळखी महिलेनी उडी मारुन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खडबड उडाली आहे.

       मात्र सदर महिलेंनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली की,तिची हत्या करून विहिरीत टाकण्यात आले हे चिमूर पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न होणार आहे.

         चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा नेरी व मौजा सावरगाव आहे.मौजा नेरीवरुन,मौजा सावरगावला जाताना रस्त्यालगत नेरी येथील श्री.रामकृष्ण लाभे यांचे शेत आहे.त्यांच्या शेतातील विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आल्याने तर्कवितर्कातंर्गत चर्चेला पेप फुटले आहेत.

      सदर घटनेची माहिती नेरी पोलिस चौकीचे इन्चार्ज व चिमूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांना  देण्यात आली आहे.