Home देशविदेश पुंजीपती,पुढारी, धर्मगुरू आणि मीडिया…

पुंजीपती,पुढारी, धर्मगुरू आणि मीडिया…

     जगात दोन वर्ग आहेत, शोषक आणि शोषित. अखिल मानव जातीचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, निसर्गाचे, ( जमीन जल जंगल यांचे ) शोषण करणारा वर्ग म्हणजे शोषित वर्ग. ज्यांचे शोषण केल्या जाते तो शोषित वर्ग होय. 

      एक छोटा वर्ग मोठा वर्गाचे शोषण करीत असतो, शोषक हा छोटा वर्ग आहे आणि शोषित म्हणजे जे पिळल्या जातात, ज्यांची पिळवणूक होते, यांचे शोषण होते असा वंचित पीडित मागासलेला मोठा वर्ग म्हणजे शोषित वर्ग होय. 

  आर्थिक शोषण, सामाजिक शोषण, धार्मिक शोषण, राजकीय शोषण, सांस्कृतिक शोषण असे शोषणाचे पाच प्रकार आहेत. समाजातील जो मोठा वर्ग आहे, संख्येने 90% आहे, यांचे या प्रत्येक क्षेत्रात यांचे शोषण हे दहा टक्के लोक म्हणजे शोषक हे शोषण करीत असतात. शोषण करण्यासाठी त्यांना अन्याय अत्याचार पण करावा लागतोच. कारण शोषित वर्ग हा विरोध करीत असतो म्हणून. 

    जे सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रातील जे पुढारी आहेत म्हणजे नेते आहेत ते हे शोषितांचे नेते नसून ते शोषक वर्गाचे नेतृत्व करीत असतात, आणि सोशल वर्गाचा फायदा किंवा हित जोपासण्याचे काम करतात. दहा टक्के भांडवलदार म्हणजेच पुंगी पती हे 90% जनतेचे अनेक मार्गाने शोषण करीत असतात, उद्योगातून नफा कमावणे, महागाई निर्माण करणे, जनतेला जुगार आणि नशा ची सवय लावणे, उत्पादित वस्तूंची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणे आणि महागाई वाढविणे आणि त्यातून भरमसाठ नफा कमावणे, व्याजाने पैसे देणे, अडचणीत असलेल्या शेतकरी शेतमजुरांना कात्रीत पकडून त्यांचे शोषण करणे, आर्थिक मिरवणूक करणे, भरमसाठ नफा कमवून तो पैसा साठवून ठेवणे आणि त्यातून परत नवीन नवीन कारखाने किंवा उद्योग करणे, परत त्यातून अफाट नफा कमवणे, धनसंपत्ती म्हणजे पैसा सोने हिरे यांची साठवणूक करणे, आयुष्य जिंदगी जगणे हे काम सोशल वर्ग करीत असतो. भांडवलदार पुंजीपती हे काम सतत करीत असतात, यांच्या बद्दल आणि यांच्या पुढाऱ्या बद्दल शोषित वर्गात विरोधी मत तयार होऊ नये किंवा त्यांच्याबद्दल राग द्वेष मत्सर निर्माण होऊ नये आणि ते त्यांच्याविरोधात संघटित होऊन बंड करू नये यासाठी धर्मगुरू कार्यरत असतात. धर्मगुरू हे देव आणि धर्माचा दाखला देऊन आणि नशिबाचे कारण पुढे करून पणजी पती आणि त्यांचे पुढारी यांच्या बद्दल श्रद्धा आणि विश्वास निर्माण करतात. यामुळे आपले पालन पोषण करणारे म्हणजे हे पुंजी पतीच आहेत, तेच आपले मायबाप आहेत, तेच आपले मालक आहेत, आपले भविष्य त्यांच्या हातात आहे, तसेच नेतेमंडळी म्हणजे पुंजीपतींचे प्रतिनिधी हे आपलेच पुढारी आहेत जे आपणास अनेक कल्याणकारी योजना देत असतात, त्यांचेही आपल्यावर फारच उपकार आहेत,” अशी भावना सर्वसामान्य जनतेत म्हणजेच शोषित वर्गात हे धर्मगुरू निर्माण करीत असतात. 

    पुंजीपती, पुढारी, धर्मगुरू या तिघांचीही संगणमत असते, हे तिघे पण जनतेचे शोषण करीत असतात, म्हणून ते एकमेकास पूरक आहेत, हे तिघे मिळून जनतेचे अनेक मार्गाने शोषण करीत असतात. 

    ह्या यांच्या कृतीस मीडिया मदत करीत असतो, म्हणजे ते जे काही बोलतात सांगतात कृती करतात, त्या सर्वांचे उद्दातीकरण करून सांगणे , त्यांचे मोठेपण सांगणे, त्यांचे महत्त्व सांगणे हे काम म्हणजे प्रसिद्धीचे काम मीडिया करीत असते, अर्थात याला काही अपवाद आहेत. खरे तर अन्याय अत्याचार बलात्कार भ्रष्टाचार शोषण पिळवणूक विषमता याविरुद्ध मीडियाने आवाज उठवायला पाहिजे, शोषितांची बाजू घ्यायला पाहिजे, परंतु हे मीडिया असे न करता उलट जे शोषित आहेत जे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार साठेबाजी काळाबाजार करतात त्यांनाच मदत करण्याचे काम करतात. म्हणूनच महागाई आणि बेकारी या महाभयंकर समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागते. 

      पुंजी पती पुढारी आणि धर्मगुरू यांचे वर सर्वसामान्य जनतेचा म्हणजेच शोषितांचा विश्वास आणि श्रद्धा निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणामध्ये मीडिया करीत असतो. वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडिया, त्यांच्या माध्यमातून नियमितपणे हे काम चालू आहे. याबरोबरच मनोरंजनाची जी साधने आहेत , आणि प्रबोधनाची जी साधने आहेत उदाहरणार्थ किर्तन भजन शाहिरी लोककला चित्रकला शिल्पकला या सर्व माध्यमाद्वारे सुद्धा पणजी पती पुढारी धर्मगुरू यांच्या बद्दल श्रद्धा आणि विश्वास निर्माण करण्याचे काम सतत होत असते, शोषणाविरुद्ध लोकांमध्ये किंवा अन्यायात प्रचाराच्या विरुद्ध लोकांमध्ये शीर निर्माण होऊन लोक संघटित होऊन उठाव करायला पाहिजे असे घडताना दिसत नाही, नव्हे असे उठाव बंद होऊ नयेत म्हणून सतत प्रयत्न चालू आहेत. 

      खरे तर शोषित आणि शोषित त्यांची लढाई रोजच असते परंतु ती अदृश्य असते, शोषक वर्ग हा महागाई बेरोजगारी साठेबाजी नफेखोरी जुगार नशिले पदार्थांची विक्री अशी कृती करून शोषक वर्ग हा शोषित वर्गावर रोजच हल्ले करीत असतो, आणि त्याच्या ह्या कृतीस शोषित वर्ग रोजच झगडत असतो. पण ही या दोघातील अदृश्य लढाई होय. ही लढाई जेव्हा दृश्य स्वरूपात दिसेल नव्हे दिसायला पाहिजे तेव्हाच शोषण थांबणार आहे. शोषण थांबल्याशिवाय शोषित आणि सोशल या दोन वर्गातील लढाई थांबणार नाही, आणि हे दोन वर्ग नष्ट होणार नाहीत. वर्ग विहीन समाज रचना निर्माण होणार नाही. 

             लेखक

             दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 8 मे 2026, फोन : 9420912209