राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
ऐतिहासिक वारसा व शहराचा मध्यभागी गजबजलेल्या मुख्य गांधी चौकात नगरपंचायत चा वैशिष्ट्य पूर्ण निधी अंतर्गत सभामंडपाचा बांधकामाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.सदर बांधकामाला अंदाजित २० लक्ष रूपयाचा खर्च अपेक्षित आहे.
बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना गडचिरोली लोकसभा समन्वयक सूरेन्द्रसिंह चंदेल,नगराध्यक्ष अनिता ताई बोरकर,उपाध्यक्ष बबलूभाई हूसैनी,भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये,उध्ववसेना तालुका अध्यक्ष आशिष काळे,शिंदे सेनेचे तालुका अध्यक्ष अनिकेत आकरे,माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे,न.प.सभापती सागर निरंकारी नगरसेवक एड.उमेश वालदे,नगरसेवक जयेंद्र सिंह चंदेल,उपविभागीय अभियंता अनिल गिरनाळे,शाखा अभियंता पाल खूशाल बंसोड,तूषार कूथे,बंठी भट्टड,दिनू भट्टड,राहूल तोंडरे,अशोक माखीजा,अनिल सचदेव,पत्रकार राकेश चव्हाण तसेच वार्डवासीय हजर होते.



