भारतात गेल्या 2014 पासून काँग्रेसच्या अती माणुसकीमुळे आणि भ्रष्टाचाराच्या उच्छादामुळे भाजपला काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याची संधी आपोआपच चालून आली. 15 लाख रुपयाचे प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्याचे आमिष मोदीने काँग्रेसच्याच भ्रष्टाचारामुळे दिलेत ना….!
शिवाय ज्या EVM च्या बळावर आज मोदी तिसऱ्यांदा सत्तेत बसले, त्या EVM ला 1987 ला काँग्रेसनेच तर लोकसभेत (अभिषेक मनू सिंघवी यांनी ) प्रस्ताव मांडून पारित केल्यानेच तर 2004 पासून सर्व निवडणूका EVM वर होताना दिसत आहेत. सुरुवातीला उत्सुकता म्हणून EVM सर्वांनाच आवडले. काँग्रेसने सुद्धा पहिल्या 2004 च्या निवडणुकीत धांदली केली नाही.
परंतू 2009 च्या लोकसभा निवडणूकीत मात्र काँग्रेसने त्यात धांदली करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच की काय डॉ.सुब्रमण्यम स्वामींनी प्रथम या EVM वर शंका घेऊन त्यावर एक शंभर पृष्ठाचे पुस्तकच प्रकाशित केले. त्याला तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी त्याला दुजोरा देऊन भाजपनेही EVM ला प्रखर विरोध केला.
अशा प्रकारे 2009 पासूनच आमच्या भारताच्या लोकांचा मताचा अधिकार खऱ्या अर्थाने हिरावून घेतल्या गेला. परंतू याची चाहूल भारतीय जनतेला 2019 लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लागली. तोपर्यंत तर सत्ताधारी भाजप मगरूर होवून बसलेला होता. आणि काँग्रेसला तर EVM च्या विरोधात तोंड उघडायला तोंडच नव्हते, कारण त्यांनीच या पिलाला जन्म दिला होता. इतर छोटे छोटे राजकीय पक्ष भाजप आणि काँग्रेस यांच्याच शेपटी होत्या. या सर्व राजकीय पक्षांच्या घोळाच्या भूमिकेमुळे बिचारी भारतीय जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त होऊन आला मार सहन करत होती.
जर याच भारतीय जनतेने विशेषतः बहुजन ओबीसी समाजाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाच्या व्यवस्थेचे गुलाम नव्हे तर देशाचे मालक बनविण्यासाठीच संविधान निर्मिले, ही जाणीव जर या समाजात झाली असती, तर देशाचे चित्र वेगळे दिसले असते.
परंतू , या समाजाचे दुर्दैव हे की या समाजाच्या विशेषतः युवापिढीत धार्मिक कर्मकांड जाऊन विज्ञानवाद अजूनही जोपासला नसल्याने हा समाज अजूनही ब्राम्हण वाद्याच्या अंकित असल्याने अजून तरी देशाचे चित्र बदलण्याची शक्यता वाटत नाही. जेंव्हा याची सुरुवात होईल निश्चितच चित्र बदलण्यास सुरुवात होईल. याची सुरुवात मात्र गोगलगाईच्या गतीने झालेली आहे, एवढे मात्र निश्चित.
याच बहुजन समाजाच्या धार्मिक कर्मकांडाच्या बळावर, आता बौध्द धम्माला सुद्धा धर्माची ग्लानी लागल्याने RSS भाजपला सत्ताधारी राजकारण सोपे गेले. म्हणून त्याना ना राजकीय स्वरूपात विरोधक उरला नाही, ना ही सामाजिक संघटनेत कोणता विरोधक राहिला नाही ( पैश्याच्या लोभाला बळी पडुन कोणताही झेंडा हाती घेण्याची तयारी ). म्हणजे सर्वच क्षेत्रात रान मोकळे झाले संविधानविरोधी शक्तीला.
त्यातल्या त्यात बुद्धीजीवी वर्गाने तर आपले दोन्ही हात वर केल्याने हा देश आता केवळ गुलामांचा देश म्हणून पुन्हा एकदा जगात नावारूपाला येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यात शंका घेण्याचे काहीही कारण नाही.
शेवटी पाश्चिमत्यांचा जो समज होता तो खरा ठरताना दिसत आहे की भारतात उठाव किंवा बंड किंवा क्रांती होऊ शकत नाही. कारण देश स्वतंत्र झाला तो इंग्लंडची पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात प्रचंड वित्त आणि प्राणहानी झाल्याने त्यांना वसाहतीवर राज्य करणे अवघड बनले म्हणून देश स्वतंत्र होऊ शकला. नसता 1857 लाच व्हायला पाहिजे होता…..!
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला जास्त महत्व दिले होते. त्यांना माहित होते की, एक दिवस इंग्रज निघून जातील पण ते स्वातंत्र्य टिकविण्यासाठी लागणारी विचारसरणी जी आहे ती या देशात ब्राम्हणवादामुळे प्रत्यक्षात उतरणार नाही. तेंव्हा केवळ स्वातंत्र्याचे करायचे काय म्हणून नेहरू सारख्यानी सुद्धा डॉ. आंबेडकर स्वातंत्र्यासाठी कधी जेलमध्ये गेले नाही म्हणून राष्ट्रवादी नसल्याचा त्यांनी ठपका ठेवला होताच ना. अशा परिस्थितीत सुद्धा डॉ. आंबेडकर यांनी हजारो वर्षाच्या दूरदृष्टीचा विचार करून भारताच्या संविधानाची निर्मिती केली. त्यासाठी संविधान सभेचे पं. नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी दारे खिडक्या सुद्धा बंद करून ठेवल्या होत्या, परंतु, म. गांधी यांनीच त्यांना उघडायला भाग पाडल्या आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सांगून बाबासाहेबांना संविधान सभेत घेण्यासाठी भाग पाडले ते केवळ यांच्याच शिफारशिवरून.
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि म. गांधीजी जरी दुसऱ्या गोलमेज परिषदेपर्यंत अर्थात पुणे करारापर्यंत 36 चा आकडा होता. परंतू तिथून पुढे म. गांधीजींच्या हत्येपर्यंत त्या दोघात हळू हळू 63 चा आकडा बनायला सुरुवात झाली.
या दोन्ही नेत्यांच्या धामधूमीत मात्र आम्हांला स्वतंत्र मतदार संघाला कायमचे मुकावे लागले. ही सल तेंव्हा बाबासाहेबांच्या हृदयात होती. समाजात सुद्धा आजही आहे. म्हणूनच की काय आमचे संयुक्त मतदारसंघातून 131 खासदार निवडून येऊन सुद्धा काहीही उपयोग नाही कारण, कुणी हनुमान चालीसा पठण करते तर कुणी गायत्री मंत्र म्हणत सभागृहात येतात. ही आमची राखीव जागेवर निवडून गेलेली मंडळी.
थोडक्यात सारांशपणे 2026 चा काळ येईपर्यंत RSS/ भाजप / मोदी / शहा / फडणवीस यांना देशातील रान मोकळे झाले. या देशात पुन्हा मनुस्मृती लागू करण्यासाठी……..!
परंतू , एक लक्षात ठेवा……
RSS / मोहन भागवत / भाजप / मोदी / शहा / फडणवीस / आणि तुमच्यासोबत असलेले लाचार आणि हतबल राजकीय पक्ष शेवटी……….
बुद्धाच्या शांतीपथावर चालणारा, आक्रमक आंबेडकरी समाजच..
तुमची जागा तुम्हांला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. जरी आज तुम्ही आमच्या भावंडात भेद निर्माण करून डाव साधत असलात तरी माझ्यासारखे बोटावर मोजण्याइतके आजही जिवंत आहेत. कारण असतील जरी आमुचे, मतभेद आपसाचे जयभिमच्या नावावर करू बलिदान जीवाचे. हे रणशिंग फुंकणारे सुद्धा आम्हीच ठरू. कारण आमच्या बापाने आम्हांला जो त्याग, संघर्ष आणि समर्पण शिकवला तो आम्ही कधीही विसरणार नाही.
त्यासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संविधान क्रांती कधीही नष्ट होऊ देणार नाही. त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला आम्ही तयार आहोत. कारण आम्ही भारताचे लोकं हे संविधान आम्ही स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. म्हणूनच आम्ही सुद्धा म्हणतो की आम्ही प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहोत.
त्यासाठीच…….
2029 च्या लोकसभा निवडणुकीत ही EVM आम्ही उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही. ही EVM च काय तुमचे प्रत्येक षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय आम्ही भारताचे लोकं राहणार नाही……..!
कारण……..
हा भारत देश तुमच्या वृत्तीचा नाही……
तुम्हांला जगात कोणताही स्वतःचा देश अथवा जमिनीचा तुकडा सुद्धा नाही…….!


