Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — युवा कंत्राटदाराचा अपघातात मृत्यु,देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील भर दुपारी घडली...

ब्रेकिंग न्यूज… — युवा कंत्राटदाराचा अपघातात मृत्यु,देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील भर दुपारी घडली घटना…

      राकेश चव्हाण 

 कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

         देसाईगंजवरून काम आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (३ मे) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

       देसाईगंज–कोंढाळा मार्गावरील लहरी कारखान्याजवळ हा अपघात झाला.गुरुदेव दिनाजी वसाके (वय २८, रा. कोठाळा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली) असे मृत तरुण कंत्राटदाराचे नाव आहे.

         मिळालेल्या माहितीनुसार, वसाके हे कामानिमित्त देसाईगंज येथे गेले होते. काम आटोपून ते दुचाकीने आपल्या गावी परतत असताना लहरी कारखान्याजवळ त्यांचा दुचाकीला देसाईगंजला येणाऱ्या रुग्णवाहिकेची धडक लागुन भीषण अपघात झाला.

       अपघात इतका गंभीर होता की त्यात ते खुप दुरवर उसळले.नागरिकानी त्यांचे मदती साठी धावपळ करित ही वार्ता त्यांचे कुटुंबियांना देताच त्यांनी घटना स्थळी धाव घेत त्यानां उपचारा करिता देसाईगंजला नेत असताना त्यांचा वाटताच मृत्यू झाला.

       या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत.