Home शैक्षणिक कला शाखेचा ७५.७५% निकाल, प्रिया सोरटे प्रथम…

कला शाखेचा ७५.७५% निकाल, प्रिया सोरटे प्रथम…

   राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

         खरमटोला येथील सी.जे.बी. चंदेल कला कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा कला शाखेचा एकूण निकाल ७५.७५ टक्के लागला आहे.

       या निकालात प्रिया सोरटे हिने ७५.६७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तर मोहिनी पोटावी हिने ६८.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान मिळवले.

          मोहिनी पोटावी

        विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जानकीबाई चंदेल, सचिव जयेंद्रसिंह चंदेल तसेच संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य उमा बी. चंदेल, प्रा.सुखदेव सर, प्रा.फुलबांधे सर, प्रा. बावनथडे सर आणि लिपिक राकेश सहारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.