शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर : नुकत्याच जाहीर झालेल्या एच.एस.सी.परीक्षा 2026 च्या निकालात राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात प्रथम स्थान पटकावले आहे.
महाविद्यालयाचा एकूण निकाल 81.92% लागला असून,वाणिज्य शाखेचा निकाल 86.40% तर कला शाखेचा निकाल 74.60% इतका आहे.
वाणिज्य शाखेत शृंगार बालाजी लोनबले यांनी 84.67% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला.प्रणव तेजराम लांडे (81.33%) यांनी द्वितीय तर हरीओम प्रेमदास राऊत (80.17%) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
कला शाखेत रितिक गुलाब जीवतोडे यांनी 77.00% गुणांसह प्रथम स्थान मिळविले.साक्षी देवाजी गुरनुले 76.83 हिने द्वितीय तर विना वसंत औतकर (73.83%) हिने तृतीय स्थान प्राप्त केले.
या यशामागे गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले,सचिव प्रा.मारोतराव भोयर,गांधी सेवा शिक्षण समितीचे सर्व सदस्य,महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य कॅप्टन डॉ.प्रफुल्ल बन्सोड,तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य राकेश कुमरे यांच्यासह रोशन कुमरे,गुणवंत वाघमारे,दुर्योधन रोकडे,रीना गाडगे,गजानन चव्हाण,नीलिमा तुरानकर,अमर ठवरे,प्रवीण वाकडे व रामटेके मॅडम व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकवृंदाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.



