दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मनरेगाची कामे मंजूर होते.अनेक ठिकाणी काम न करता करोडो रुपयाची देयके सादर केली.त्यासाठी लाखो रुपये लाच घेऊन एपीओ अजय काकडे यांनी शासनाची दिशाभूल केली.
ज्यात सार्वजनिक व वैक्तिक कामे आहेत.काही उदाहरण खालीलप्रमाणे आहेत.
1) कोटगाव येथील ग्रामरोजगार सेवक चरणदास वाघ यांना विहीर मंजूर झाली 2025 मध्ये काम सुरु झाल्याचे दाखवून,मजूर म्हणून स्वतःचा मुलगा,पत्नी व मुलगी यांचे उपस्थिती दाखवून हजेरी पत्रक तयार केले व देयके उचल केले.
सदर कामाची पाहणी न करता एपीओ अजय काकडे यांनी देयके काढण्यासाठी मदत केली.परंतु सदर कामाची तक्रार झाल्यामुळे वस्तुस्थिती जनतेसमोर येईल व प्रशांसनास कारवाही करण्यास संधी मिळेल या भीती पोटी 31/3/2026 रोजी पोकल्यांड मशीन द्वारे खोदकामास सुरुवात केली अशी माहिती विलास डांगे यांना कोटगावातून मिळाली.
त्यामुळे विलास डांगे यांनी विहीर बांधकाचे स्थळ गाठले त्यावेळी चरणदास वाघ यांचा मुलगा व एक मुलगा सोबत होता.मशीनवर एक अंदाजे पंधरा वर्षाचा मध्यप्रदेशाचा मुलगा व वाघेडा येथील ड्रायव्हर हजर होता.
त्यावेळी जि.पी.एस.ऍप द्वारे फोटो घेतले व समधित पंचायत समिती अधिकारी चिमूर व जिल्हा परिषद अधिकारी मनरेगा यांना पाठविले व तशी लेखी तक्रार अनेकवेळा केलेली आहे.
2) गजानन लांजेकर रा.नेरी या लाभार्थी कडून विहिरीचे बांधकाम सुरु होण्यापूर्वी 75,000 रु.नगदी घेतले व सही केलेले दोन कोरे चेक एपीओ अजय काकडे यांनी घेतले व बिल निघून सुद्धा पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी श्री. नितीन फुलझले यांचे कर्यालयात केली.मात्र श्री.नितीन फुलझले गविअ यांनी दखल घेतली नाही.
दुसऱ्या दिवशी पुन्हा लांजेकर यांनी गटविकास अधिकारी व विलास डांगे यांचेकडे लेखी तक्रार केली व प्रिंट मीडियाला मुलाखत दिली.तक्रारीत असेही नमूद आहे एपीओ काकडे हेच ठेकेदार आहेत,खोदकामासाठी मजूर न लावता मशीन द्वारे करण्यात आले खोदकाम किती खोल आहे.
सलाख कोणती व किती बार वापरले,विहीरीची जाडी,गोलाई नमूद आहे याबाबत विलास डांगेनी गटविकास अधिकारी यांना सर्व प्रकार लक्षात आणून दिला मात्र दखल न घेता गविअ यांनी एपीओ अजय काकडे व विकास मेश्राम यास केबिनला बोलावून घेतले.
त्यानंतर विलास डांगे केबिन बाहेर आले दुसरे दिवशी काकडे उसेगावचे ग्रामरो जगार सेवक यांनी लांजेकर यांचेकडे गेले नेरीच्या सरपंच यांनी फोन करुन तक्रार मागे घेण्यास सांगितले.मी तक्रार मागे घेतली तुम्ही तक्रार थांबवून टाका असा फोन लांजेवार यांनी विलास डांगे यास फोनवरून सांगितले.
परंतु विलास डांगे यांनी तक्रार जिल्हा परिषद कडे दिली व उपमुकाअ यांनी टीम पाठवली,टीम आली,परंतु टीमने कोणताही गाजावाजा न करता चुपचाप एपीओ विकास मेश्राम यास सोबत घेऊन नेरीला गेले.काय समझोता झाला माहित नाही,चौकशी करणारी टीम तक्रारीतील इतर गँभीर मुद्दे व पुरावे नष्ट करता यावे या हेतूने चौकशी न करता फरार झाले.
3) श्रीकृष्ण जाभूळे वाघेडा यांची विहीर खोदकाम सुरु केला नाही.मात्र काम सुरु होण्यापूर्वी 30,000+5000 घेतले पुन्हा पैसे एपीओ अजय वाकडे मागत आहे.अशी तक्रार सुमित्रा श्रीकृष्ण जांभुळे यांनी केली व चौकात त्यांनी मांढलेली हकीकत मोबाईल कॅमेऱ्यात घेतली.
मात्र येथेही हेच एप्रिल 2026 तक्रारीचे दिवसा पर्यंत कोणतेही खोदकाम काम सुरु झाले नाही.तरी 2025 मध्ये हजेरी पत्रक तयार करुन देयके काढली.असे अनेक प्रकार आहेत.काही ठिकाणी एकच मजूर तीन गावात कामावर असल्याचे दाखवले आहे.तो मजूर 20 लाखाचे गाडीने फिरतो आहे.त्या मजूराकडे दोन दोन बंगले असून तो इतर गाड्याचा मालक आहे.

तद्वतच पूर्ण परिवार घेऊन मजूर दाखवतात काय दुर्दैव आहे.कोटगाव मध्ये तर कहर झाला.अनेक कामावर रोजगार सेवक चरणदास वाघ यांनी अंदाजे मुलाचे 96 मष्टर,पत्नीचे 60 मष्टर,व मुलीचे 34 मष्टर काढले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हे करतात अशा चोऱ्या अन मग सरपंचाचा आधार घेऊन ग्रामसेवक,ग्रामरोजगार सेवक, विलास डांगेची तक्रार करतात व बदनामी करतात.पण असे केल्याने घोटाळा लपत नाही असे विलास डांगे यांचे म्हणणे आहे.



