राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
गेवर्धा (ता. कुरखेडा, जि. गडचिरोली) येथे संकल्प फाउंडेशनच्या वतीने नागरिकांसाठी आरोग्य निदान व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गेवर्धा येथे पार पडणार आहे.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. ब्रम्हपुरी चे प्रख्यात डॉ.भारत गणवीर (एम.बी.बी.एस., एम.डी.) तसेच डॉ. मिनु गणवीर (एम.बी.बी.एस., डी.सी.एच.) हे दोन्ही डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत.
विशेषतः स्त्रिया, पुरुष व लहान मुलांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असून, सर्व आजारांची तपासणी करून योग्य उपचार करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ.जगदीश बोरकर सह आयोजकांनी केले आहे.



