या देशात आणि संपूर्ण विश्वात केवळ दोनच शक्ती अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. एक शक्ती निसर्गनियमावर आधारित आहे, तर दुसरी तीच्या विरुद्ध आहे.
सुमारे साढेचारशे कोटी वर्षांपूर्वीपासून अर्थात पृथ्वीच्या उत्क्रांतीतून निर्मिती झाल्यापासून ते सुमारे 6000 वर्षांपूर्वीपर्यंत या पृथ्वीतलावर सर्वकाही निसर्गनियमानुसारच मानव वर्तन करत आलेला होता. परंतू सहा हजार वर्षांपूर्वी याच मानवातील दानव निर्माण झाला तो याच आर्याच्या रूपाने…..!
या विश्वात प्रथम निसर्ग नियमांना छेद देण्याचे काम जर कुणी केले असेल तर ते या आर्यानी केले. त्यांनी येथील सर्व सजीव सृष्टीला आपले गुलाम समजून त्यांच्या सर्व हक्काचे हणन केले. केवळ या विश्वात आपणच सर्वस्वी असण्याचा अधिकार केवळ आपल्यालाच आहे. हे दाखवून देण्याचा प्रयत्न गेल्या सहा हजार वर्षापासून आजपर्यंत करत आलेले आहेत.
म्हणून निसर्गनियमांना छेद देऊन आर्यानी प्रथम या पृथ्वीतलावर प्रतीक्रांतीची लाट निर्माण केली. आणि याच प्रतीक्रांतीच्या विरोधात तथागत भगवान बुद्धानी धम्माच्या निर्मितीतुन प्रथमच क्रांतीची लाट निर्माण करून यांना शह दिला.
याच त्या दोन शक्ती होत. ज्यांच्या संघर्षामुळे प्राचीन काळापासून ते आजपर्यंत क्रांती – प्रतीक्रांतीच्या लाटा निर्माण होऊन भारतच काय संपूर्ण विश्वच आज अस्थीर झाले आहे ( इराण v/स अमेरिका संघर्ष त्याचेच प्रतीक होय ).
म्हणून आज 2026 च्या काळात देशातील आणि संपूर्ण विश्वातील या दोन शक्तीतील अर्थात मानव आणि मानवातील दानव या दोनच प्रकारात येथील माणसाचा समावेश करावा लागेल. आणि विशेष करून आपल्या भारतातील मानवी वृतीचा जर समावेश करायचा असेल तर संविधानवादी आणि संविधानविरोधी असाच करावा लागेल.
या संपूर्ण विश्वात तथागत भगवान बुद्धापासून ते आजपर्यंत जेवढे काही महापुरुष / तत्ववेत्ते होऊन गेले, ते सर्व क्रांती करणारे क्रांतिकारक या निसर्गनियमांना समजून घेऊन त्यानुसार आचरण करणारे होते.
दुसऱ्या विरुद्ध बाजूला आर्याच्या कूटनितीच्या टोळ्यांच्या निर्मिती आणि आगमनापासून ते आजपर्यंतच्या RSS / मोहन भागवत / मोदी / शहा / फडणवीस / आणि यांची नाजायज राजकीय मित्रपक्ष पिलावळ यांच्या निर्मिती करणारे होते.
हा जसा गट भारतात पडला असाच दुसरा गट विश्वात पडला. त्या गटात दक्षिण आफ्रिका सोडून सर्वच अन्वस्त्रधारी देश त्यात समाविष्ट होतात. अणुबॉम्बच्या खुमखूमीवर एकमेकांना गुरगूरण्याची खुन्नस निर्माण झाली. यामध्ये किम जोंग, डोनाल्ड ट्रम्प, पुतीन, शी – जेनपिंग, इस्राएल, इत्यादी आहेत.
थोडक्यात सारांश असा की या प्रतीक्रांतीच्या लाटेने आता वैश्विक रौद्ररूप धारण केले आहे. त्याची कधी दोरी तुटेल आणि कधी मानव जात नष्ट होईल याचा नेम नाही.
परंतू जेंव्हा आपण आपल्या देशापुरता विचार करतो, तेंव्हा मात्र आपल्या देशातील संविधानविरोधी शक्ती याच संविधानाला संपवण्यासाठी 1951 च्या पहिल्या घटना दुरुस्तीपासून गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहे. ती केवळ संधीची वाटच पहात होती. ती संधी तीला 2014 पासून चालून आली. त्या संधीचे सोने करण्यासाठी ती आतुर झालेली आहे……!
परंतू त्यांचे हे षडयंत्र 2029 पूर्वीपर्यंत संविधानवाद्यांना कायमचे हाणून पाडावेच लागतील. त्यासाठी 2014 पासून या प्रतीक्रांती शक्तीने क्रांतीचा पराभव करण्यासाठी कसे कसे आणि काय काय प्रयत्न केले, ते उद्याच्या भागात पाहू.


