Home Social “आंतरजातीय व आंतरधर्मीय सामूहिक सत्यशोधक विवाह सोहळा,चिमूर येथे नेचर फाउंडेशने केले आयोजित… ...

“आंतरजातीय व आंतरधर्मीय सामूहिक सत्यशोधक विवाह सोहळा,चिमूर येथे नेचर फाउंडेशने केले आयोजित…  — मुख्यमार्गदर्शक म्हणून ॲड.असीम सरोदे राहणार उपस्थित… 

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

      विदर्भात तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या,”नेचर फाउंडेशन नागपूर,या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी आंतरजातीय व आंतरधर्मीय सत्यशोधक सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जात असतो.

      हा आंतरजातीय सोहळा चिमूर तालुक्यातील शिवापूर (बंदर) येथे गतवर्षी पहिल्यांदा आयोजन केलेला होता.या ठिकाणी 11 जोडप्यांचा विवाह तसेच 22 जोडप्यांचा सत्कार करण्यात आलेला होता.

        यावर्षीचा हा विवाह सोहळा उष्णतेच्या लाटेमुळे चिमुर येथील शहीद बालाजी रायपूरकर सभागृह,पिंपळनेरी रोड,चिमूर येथे १७ मे २०२६ रोज रविवारला आयोजित केलेला आहे. 

      या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे यावर्षी मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध ॲड.असीम सुहास सरोदे(संविधान अभ्यासात व विश्लेषक),इंजि.ह.भ.प भाऊसाहेब थूटे (राष्ट्रीय प्रबोधनकार) आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा.भगवान नन्नावरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

       यावर्षी या कार्यक्रमात दिसून आंतरजातीय विवाहित ३० हून अधिक जोडप्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

      याकरिता संपूर्ण चिमूर,सिंदेवाही,भिवापूर,उमरेड,वरोरा,भद्रावती व समुद्रपूर तालुक्यातील भारताचे संविधान व भारतावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन नेचर फाउंडेशन संस्थापक निलेश नन्नावरे यांनी केले आहे.