Home Maharashtra सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या...

सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेचे 24 मे ला आयोजन… — विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा 9 जून ला पहेला येथे होणार सत्कार! — फिल्म अभिनेते अश्विनकुमार,माजी खासदार खुशाल बोपचे,अभिनेत्री चैताली भस्मे राहणार उपस्थित…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

दखल न्यूज भारत 

भंडारा – “सन्मान द्या व सन्मान घ्या,या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 24 मे 2026 ला सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय वस्तुनिष्ठ स्पर्धा परीक्षेचे आयोजन पहेला,अड्याळ या ठिकाणी करण्यात आलेले आहे.

      सदर परीक्षेत 10 वी पास ते पदवीधर मुला-मुलींना परीक्षेत बसता येईल यात वयाची कोणतीही अट नाही.यामध्ये परीक्षा प्रवेश फी 100 रुपये आकारण्यात आली असून परीक्षेत प्रथम,द्वितीय,व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे 1001,701,501 रुपये व सोबतच सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ,देऊन त्यांचा फिल्म अभिनेते अश्विन कुमार,माजी खासदार खुशाल बोपचे,अभिनेत्री चैताली भस्मे यांच्या उपस्थितीत त्यांच्या सन्मान करण्यात येईल.

      त्याचप्रमाणे विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते पत्रकार,कवी,लेखक,कृषी क्षेत्रातील अधिकारी,साहित्यिक,प्रबोधनकार,डॉक्टर,वकील,दिव्यांग, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी, ज्यांच्या समाजासाठी योगदान आहे असे कार्यकर्ते,यांच्या सुद्धा सत्कार करण्यात येईल.

     त्यांनी पत्रकार संजीव भांबोरे मोबाईल क्रमांक 70 66 37 04 89 संपर्क साधावा व परीक्षार्थी यांनी सावित्रीबाई फुले वाचनालयाचे संचालक रजत राऊत मोबाईल क्रमांक 72 18 10 36 60, संघर्ष पोलीस भरती अकॅडमी पहेला अड्याळचे संचालक कृपाल ढवळे मोबाईल क्रमांक 97 65 30 60 20, विलास भांडेगाव चे सनराईज कम्प्युटर पहेला मोबाईल क्रमांक 99 21 04 82 83 क्रमांकावर संपर्क साधून प्रवेश फी,नाव,पत्ता,मोबाईल क्रमांक देऊन संपर्क साधावा.

      परीक्षा 24 मे 2026 रोजी सकाळी नऊ वाजता पहेला/ अड्याळ या ठिकाणी घेण्यात येईल.परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नोंद 20 मे 2026 पर्यंत करावी त्यानंतर आलेल्या उमेदवाराचा विचार करण्यात येणार नाही निकाल घोषित 31 मे 2026 ला सकाळी 11 वाजता यादी घोषित करण्यात येईल व संपूर्ण गुणवत्ताधारक विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार 9 जून 2026 ला सकाळी11 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पहेला येथे करण्यात येईल.