Home देशविदेश दानत आणि दायित्व…

दानत आणि दायित्व…

  दानत म्हणजे दान देण्याची प्रवृती ,मनाचा मोठेपणा.दायित्व म्हणजे कर्तव्य.जबाबदारी.

   दानत आणि दायित्व हे माणसाचे गुण आहेत.हे गुण नसणे म्हणजे अवगुणी माणूस म्हटल्या जातो.

    कुटुंब,गाव,देश,समाजाला दानत आणि दायित्व असलेल्या गुणी लोकांची गरज असते.अशी गुणी माणसे ज्या कुटुंबात असतात त्या कुटुंबाची भरभराट होते,याच प्रमाणे देशाची व देशातील समाजाची भरभराट होते.आणि याविरुद्ध अवगुण असलेल्या माणसांची संख्या जिथे असते तिथे सुख शांती समृद्धी आनंद समाधान या जीवनावश्यक गोष्टींची वानवा असते.

      दानत आणि दायित्व नसलेल्या समाजात एखादा कल्याणकारी किंवा परिवर्तनवादी कार्यक्रम घेणे , ही एक डोके दुखीचं होऊन बसते.ध्येयवादी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांसाठी एखादा कार्यक्रम घेणे म्हणजे जीवावरची पोळी किंवा जोखीमच असते.

     या बाबतीत कालच एक अनुभव आला. तो असा.

        सध्या ढोंगीबाबा महाराज यांचा फारच सुळसुळाट झालाय.अनेक आमिष दाखवून ते स्त्रियांचे आर्थिक आणि यौन शोषण करीत आहेत,त्यांचे भक्त तर सर्वसामान्य आहेतच कारण देव आणि धर्माच्या नावाने या देशात काहीही उपद्रव करता येतो.हे माहित असूनही राजकीय पुढारी भोंदूबाबांचे नादी लागलेत.खरे तर अनिस कायदा 2005 नुसार देवाचे धर्माचे नाव घेऊन जे भोंदू बाबा लोकांचे आर्थिक शोषण करतात,स्त्रियांचे लैंगिक शोषण करतात,हिंसाचार भ्रष्टाचार चोरी करतात,अशांची जागा तुरुंगात पाहिजे.पण असे न होता,मंत्र्यांच्या मदतीने असे भोंदू महाराज आपापली मोठमोठी आश्रम स्थापन करून संस्थानिक होऊन बसले आहेत.

    अशांचा भांडाफोड करण्याची मोहीम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा.शाम मानव यांनी सुरू केली,आणि अनेक भोंदू बाबांना सळो की पळो केले.याचाच एक भाग म्हणून लोकजागृतीचा कार्यक्रम घेण्यासाठी मोहीम सुरू केली.महाराष्ट्रात अनेक व्याख्याने आयोजित करायचा निर्णय घेतला.विषय घेतला.” बुवा तेथे बाया”.

    अनिस नांदेड शाखेचा संघटक हाडाचा प्रामाणिक ध्येयवादी झपाटलेला कार्यकर्ता इरवंत सूर्यकर यांनी नांदेडला शाम मानवचे व्याख्यान घ्यावे,या इराद्याने नांदेडच्या 40 कार्यकर्त्यांची मीटिंग बोलावली.फक्त 10 ते 12 कार्यकर्ते आले.दुसरी मीटिंग बोलावली फक्त 7 कार्यकर्ते आले.मीटिंग मध्ये व्याख्यान कार्यक्रमाचे बजेट ठेवले.ते एक लाख रुपये.कार्यकर्ते सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना हा आर्थिक बोझ उचलणे शक्य नव्हते,म्हणून पैसेवाल्याकडे मागणी करण्याचे ठरले.मी आर्थिक सहयोगाचे आवाहन म्हणून एक मेसेज तयार केला.आणि तो 15 लोकांना पाठविला.त्यात थोडे प्रलोभन ठेवले,ते हे की,जे कुणी 5 हजार देतील,त्यांचे नाव फलकावर ” विशेष उपस्थिती ‘ म्हणून टाकू.तरी 15 पैकी फक्त एकट्याने 5 हजार दिले,दोघांनी अडीच हजार दिले.बाकीच्यांनी उत्तर सुद्धा दिले नाही.या 15 चे यादीत प्राध्यापक ,डॉक्टर,डेप्युटी सीईओ,समाज कल्याण आयुक्त माजी ,वनखात्याचे जिल्ह्याचे माजी अधिकारी होते.कुणीच रिस्पॉन्स दिला नाही.कार्यकर्ते मीटिंगला येत नाहीत.सारी जबाबदारी सूर्यकर,देविदास इंगळे आणि माझ्यावर पडली.कारण मी अनिस शाखेचा मार्गदर्शक सल्लागार ,इंगळे सर अध्यक्ष आणि सूर्यकार शाखा संघटक आमच्या तिघावरच सारी भिस्त.आम्हाला चिंता सतवू लागली. आम्ही युक्ती शोधली सभागृहाचे भाडे 22 हजार खासदाराला द्यायला लावू,त्यांना या कार्यक्रमाचे अध्यक्ष करू,पाच सहा चौकात मोठमोठी बॅनर्स ,स्टेजवरील बॅनर याचा खर्च 20 हजार एक निष्ठावंत नेता फारुक अहमद यांचेकडे ही जबाबदारी देऊ.पांपलेट दहहजार चे पैसे,पत्रकार परिषदेचे सहहजर , रेस्ट हाऊस भाडे हे सारे साठी निधी गोळा करू.असे ठरल्यानुसार सारे झाले.सर्वांना भेटावे लागले.ऐन उन्हात खासदाराला तीन चार वेळेस भेटणे,रेस्ट हाऊस,पोलिस स्टेशन परवानगी व संरक्षण साठी चार फेऱ्या मारणे,समाजकल्याण आयुक्ताला भेटणे,पैसे देण्याकडे फेऱ्या मारणे हे सारे इरवंत नि केले.एकट्यानेच खूप खूप परिश्रम घेतले.त्यास इंगळे सरांचा त्यांनी त्यांची खाजगी कामे सांभाळीत मदत केली.मला ऊन लागले, ताप आली, अंग दुखी ,पोट दुखी सुरू झाली.म्हणून मी पूर्ण वेळ देऊ शकलो नाही,तरी जिथे काम अडेल तिथे गेलोच,घरच्यांच्या शिव्या खाऊनही.

    मोठमोठे बॅनर सिडको आणि नांदेडच्या महत्त्वाच्या चौकात तर लागले,त्यावर तर स्थळ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह टाकलेले.खासदाराचे पैसे तर मिळेनात,त्यांची भेट होईना,फोन लागेना,कार्यक्रम तर उद्याच.आम्हाला भयानक टेन्शन आले.यावर काही तोडगा अनंत राऊत सर काढतील,पर्यायी 22 हजार जमविण्याचा मार्ग सांगतील,म्हणून मी उज्वला ,इरवंत राऊत सरांकडे गेलो,त्यांनी धीर दिला.काही लोकांना त्यांनी फोन केला. उज्वलाने एकनाथ मोरें ना फोनवरून दम दिला.म्हणाली ” खासदाराच्या निवडणुकीत आम्ही एक पैशाची अपेक्षा न करता प्रचार केला.याचा विसर पडला असेल तर अजून निवडणूक येणारच आहे.याचा विचार करा.निधी जाहीर करून टाळाटाळ करण्यामुळे आम्हाला फारच तुम्ही टेन्शन दिले आहे. ” या कॉम्रेड उज्वलाच्या बोलण्याचा परिणाम झाला, आणि खासदारांनी 22 हजार रुपये दिले. ते ऐनवेळी. या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार आणि उद्घाटक भाई फारुख अहमद ही दोघे पण कार्यक्रमास आले नाहीत.कारण त्यांना सामाजिक कार्यक्रमापेक्षा राजकीय किंवा धार्मिक किंवा एखादे लग्न किंवा खाजगी कार्यक्रम महत्वाचा वाटतो.जो पर्यंत सामाजिक कार्यक्रमास प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही,केवळ राजकीयच कार्यक्रम महत्वाचे वाटतात, तो पर्यंत परिवर्तन होणे शक्य नाही.

   असो.शेवटी अथक प्रयत्नातून,अनेक संकटातूनही हा कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे समाधान वाटले.हा कार्यक्रम म्हणजे हाऊसफुल आणि टेन्शन फुल असाच अनुभव देणारा ठरला.यातून एक शिकायला मिळाले,ते हे की,कार्यकर्ते मीटिंगला येत नाहीत,मात्र ऐन कार्यक्रमाचे वेळी मात्र येतात,कुणीच झटत नाहीत,स्टेजवर तर बसायला मिळाले पाहिजे,ही अपेक्षा करतात.या प्रवृतिस दानत प्रवृती म्हणता येणार नाही,तर यास दान वि प्रवृती म्हटले पाहिजे.तसेच हजारो लाखो ची मासिक कमाई असूनही अशा महत्वाच्या सामाजिक परिवर्तन घडवू शकणाऱ्या कार्यक्रमास कळकळीची विनंती करूनही 25 पैकी पाचच लोकांनी तेही फक्त हजार किंवा दोन हजार रुपये द्यावेत, ही मोठी शोकांतिका आहे.याचा अर्थ सुशिक्षित श्रीमंत यांच्यात दान देण्याची प्रवृती नाही.हे देशाचे बहुजनांचे दुर्दैव आहे.यातून आपण कधी बाहेर पडणार ? कधी क्रांती करणार ? हा एक गंभीर विषय आहे.

     असो.ज्यास परिवर्तनाची गरज वाटते, अशांनी निराश व्हायचे नसते,निगेटीव थिंकिंग करायचे नसते.आशावादी असणे जरुरीचे आहे.कार्य केलेच पाहिजे.कार्यातून अनुभव मिळतो,अनुभव माणसाला पुढे जाण्यास,चुका दुरुस्ती करण्यास मदत करीत असतो.परिवर्तनाची लढाई ही उथळ नाही.” पी हळद , हो गोरी ” असे शक्य नाही.परिवर्तनाची लढाई ही खडतर आणि लंबी असते.पण शेवटी सत्याचाच विजय होतो.अंधारानंतर उजेड येतोच.रात्र संपणारच असते.उजाडणार हे निश्चित असते.समाजमन बुध्दीचा सूर्य आज ना उद्या उगवणारच आहे.यावर आपला विश्वास आहे.असावा.

  असो.कालचा कार्यक्रम जरी टेन्शन फुल असला तरी हाऊसफुल झाला.यातच आमचा सारा थकवा गेला.

   शेवटी या कार्यक्रमाचे श्रेय इरवंत सूर्यकारलाच जाते.बाकी आपण सारे त्यास टेकन होतो,हे प्रामाणिकपणे कबूल करावेच लागते.कारण माझ्या आणि इंगळे सारापेक्षाही जास्त टेन्शन इरवंत लाच होते.हे मान्यच करावे लागते.

     इरवंत ची ही जिद्द,उत्साह , प्रामाणिकपणा असाच टिकून रहावा,त्यास नेहमीच यश मिळत रहावे.ही मनापासून शुभेच्छा.कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन.

             लेखक 

            दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

     दिनांक : 6 मे 2026, फोन : 9420912209