Home देशविदेश “बुवा तेथे बाया,या विषयावर आज सोमवारला सायंकाळी नांदेड येथे जाहीर व्याख्यान… ...

“बुवा तेथे बाया,या विषयावर आज सोमवारला सायंकाळी नांदेड येथे जाहीर व्याख्यान… — व्याख्यान स्थळ,”शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

     “बुवा तिथे बाया,या विषयावर आज नांदेड (जिल्हा) येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे मुख्यवक्ता अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव आहेत.

        खरात सारख्या बाबाला स्त्रिया का फसतात?बुवा-ज्योतिषी महिलांना कसे फसवतात? कोणती प्रलोभने दिली जातात? शारीरिक व आर्थिक शोषण कसे होते? ढोंगी बाबांना ओळखायचे कसे ?जादूटोणाविरोधी कायद्यात बाबांवर कारवाई होऊ शकते ?या विषयाला अनुसरून प्रत्यक्ष अनुभव व भांडाफोड प्रकरणांचा उहापोह आजच्या व्याख्यान कार्यक्रमात होणार आहे…

    आज सोमवार दिनांक ०४/०५/२०२६ ला,सायंकाळी 6:30 वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.”कार्यक्रमाचे स्थळ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड,आहे.

      बुवा तिथे बाया या व्याख्यानाचे आयोजन नांदेड अ.भा.अंनिस जिल्हा शाखा व समविचारी पक्ष,संघटना नांदेड द्वारा करण्यात आले आहे..

          संयोजन समितीचे प्रमुख अँड.कॉ.प्रदीप नागापूरकर,प्रा.इरवंत सुर्यकार,प्रा.देविदास इंगळे,आ.दत्ता तुमवाड,कॉ उज्वला पडलवार,प्रा.ब.ना. गोईनवाड,प्रज्ञाधर ढवळे,सपना टोमके,डि.एन.मोरे खैरकेकर,बालाजी पाटोळे,प्रा.नरेश भिसे,बालाजी गायकवाड,अँड.सत्यकुमार जाधव,कॉ.लता गायकवाड,संकेत पाटील हे आहेत.

 संपर्क क्रमांक :- Mob… 9923582791,7507463278