Home देशविदेश RSS / मनुवाद्यांनो ( बाहेरून आलेल्या आर्यानो ) या पृथ्वीतलावर तुम्हाला स्वतःचा...

RSS / मनुवाद्यांनो ( बाहेरून आलेल्या आर्यानो ) या पृथ्वीतलावर तुम्हाला स्वतःचा देशच नाही………. — हा सिंधू संस्कृतीतला भारत देश आहे. तो केवळ आमच्या भारतीय लोकांचाच आहे……    — भाग = 01

        अतीप्राचीन जगाच्या इतिहासात मोहेंजोदाडो आणि हडप्पा उत्क्खणनातील ही प्राचीन शहरे आमच्या मूळ सिंधू संस्कृतीची (भारतीय) ओळख सांगतात, जी संपूर्ण स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या निसर्ग नियमावर आधारित असलेल्या लोकशाही मूल्यांना शंभर टक्के अविष्कारीत झालेली होती. 

        अशा प्रकारच्या लोकशाहीवादी मानवी संस्कृती या पृथ्वीतलावर केवळ दोनच देशात विकसीत झालेल्या होती , एक ग्रीक ( ग्रीक संस्कृती ) आणि दुसरा भारत ( सिंधु संस्कृती ) आज जी कांही जगात लोकशाही मूल्यांची अविष्कारिता विविध देशात दिसते विशेषतः इंग्लंडमध्ये ( आधुनिक काळात याच देशातून इतरत्र ती पसरली आहे ), ती याच दोन देशांची देणगी आहे.

     विशेष म्हणजे या दोनच देशांवर *नेभळट, षंढ आणि नपुसंक अशी निसर्गनियमविरोधी, मानवताविरोधी असलेल्या कुसांस्कृतिक साम, दाम, दंड आणि भेदावर आधारित असलेली कुटनितीवर तरलेली ही मनुवादी कुसंस्कृती* हीने कुसांस्कृतिक आक्रमण करून येथील लोकशाही मूल्ये कलंकित करून तीला नष्ट करण्याचे काम केले. येथील लोकांमध्ये आपापसात मतभेद निर्माण करण्यासाठी देव, परमेश्वर, धर्म व धार्मिक कर्मकांडावर आधारित असलेल्या अंधश्रद्धा यांचा पगडा बहुजनांवर लादून यांना आपले कुसांस्कृतिक मानसिक व शारीरिक हतबल गुलाम बनविले. गुलामांना केवळ कर्तव्य असतात, अधिकार नसतात. या त्यांच्या षडयंत्राला येथील *बहुजन समाज* अलगद त्यांच्या जाळ्यात अडकला, जो लोकसंख्येच्या प्रमाणात बहुमतात होता. 

    याच आर्याच्या…. निसर्गनियमविरोधी, मानवताविरोधी या षडयंत्राविरोधात, प्रतीक्रांतीविरोधात या पृथ्वीतलावर जगात प्रथम जर विरोध कुणी केला असेल……..

  या निसर्गनियमांना……

   या मानवी मूल्यांना……

 या लोकशाही मूल्यांना…..

  पुन्हा उजाळा देण्यासाठी जर कुणी प्रथम क्रांती केली असेल, तर ती केवळ आणि केवळ…..

       तथागत भगवान बुद्धांनी बुद्ध धम्माची निर्मिती करून केली……..

        आणि पुढे याच धम्माच्या तत्वज्ञानाचा आधार घेत भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर दहा वर्षांनी ग्रीकमध्ये जन्मलेल्या :- सोक्रेटीस  ( ग्रीक तत्वज्ञ)

      यांनी ग्रीकमधील याच आर्यानी उच्छाद मांडलेल्या षडयंत्राविरुद्ध तरुणांनाच जागृत करून या प्रतीक्रांतीला दंड थोपटून शह दिला.

        अशिक्षित असलेले, अठराविश्व दारिद्र्य असलेले, दिसायला अगदी कुरूप असलेले, जगाच्या तत्वज्ञानाचे जनक ज्याला म्हणतात असे हे सॉक्रेटीस यांनी भगवान बुद्धाच्यानंतर प्रतीक्रांतीला शह देणारे जगाचे दुसरे क्रांतिकारक ठरले………..

    म्हणूनच म्हणावेसे वाटते…..

       “तत्वज्ञानाशिवाय शील नाही, शीलाशिवाय सत्य नाही, सत्याशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय विज्ञान नाही, विज्ञानाशिवाय तंत्रज्ञान नाही, तंत्रज्ञानाशिवाय प्रगती नाही, प्रगतीशिवाय क्रांती नाही, क्रांतीशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय गत्यंतर नाही….. 

       म्हणून शांतीचा दूत असलेले भगवान बुद्ध आणि तत्वज्ञानाचे जनक असलेले सॉक्रेटीस या दोन महामानवाचे अनंत उपकार या जगावर आहेत. 

        विशेष म्हणजे मूळ सिंधू संस्कृती (भारतीय संस्कृती) आणि ग्रीक संस्कृती ज्या या नेभळट आर्याच्या आगमनापूर्वीच्या होत्या. त्या लोकशाहीवादी, निसर्गनियमावर आधारित असलेल्या, मानवतावादी, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारलेल्या…….

       सिंधू संस्कृती आणि ग्रीक संस्कृती च्या दिशेनेच स्वतंत्र भारताला घेऊन जाण्याचा प्रयत्न 26 नोव्हेंबर 1949 रोजी……..

      भारताच्या संविधानाची निर्मिती करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केला……

    या लेखाचा पुढील भाग उद्याच्या भागात……. 

संविधान जागृतीचा कृतिशील लेखक आणि संविधान विश्लेषक

     अनंत केरबाजी भवरे

 रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689