Home Maharashtra घरकूल व वैयक्तिक बांधकामाकरीता शासकीय योजनेतून रेती उपलब्ध करून द्या :- नागरीकांचे...

घरकूल व वैयक्तिक बांधकामाकरीता शासकीय योजनेतून रेती उपलब्ध करून द्या :- नागरीकांचे कूरखेडा तहसीलदाराना निवेदन…

      लक्षवेधी

     राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा

      तहसील कार्यालय कूरखेडा यांचा वतीने वाळू- रेती निर्गती धोरण २०२५ अन्वये स्थानिक घरकूल लाभार्थी याना मोफत तर इतर वैयक्तिक बांधकामाकरीता ५ ब्रासचा मर्यादेत ६०० रू.प्रति ब्रास दर आकारत स्थानिक घाटातून रेती उपलब्ध करून देण्यात येत होती.

      मात्र मागील एक महिण्यापासून सदर योजणे अंतर्गत रेती परवाने बंद करण्यात आल्याने स्थानिक गोरगरीब घरकुल लाभार्थी व वैयक्तिक बांधकाम करणारे अडचणीत येत बांधकामे ठप्प झाली आहेत.

      शासनाने उपरोक्त धोरणा अंतर्गत पूर्ववत रेती परवाने निर्गमित करीत लाभार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आज सोमवार रोजी स्थानिकांचा वतीने तहसीलदार राहूल पाटील याना निवेदन देत करण्यात आली आहे.

            पर्यावरण अनूमती प्राप्त वाळू घाटा पैकी जे वाळू घाट लिलावात गेले नाही अशा वाळू घाटातून शासकीय घरकूल लाभार्थाना स्वामीत्वधन न आकारता कमाल ५ ब्रास रेती उपलब्ध करून देणे,तसेच याच घाटातून इतर स्थानिक रहिवाशांना त्यांचा घराचा बांधकामाकरीता वाळूची मागणी केल्यास कमाल ५ ब्रास मर्यादेत वाळू स्वामीत्वधन प्रति ब्रास ६०० रू.आकारत उपलब्ध करून देण्यात यावे असा दि.८ एप्रील २०२५ चा महाराष्ट्र शाशन महसूल व वनविभागाचा शासनादेश आहे. 

      या अंतर्गत मागील महिण्यापर्यंत पात्र लाभार्थ्यांना रेती परवाने उपलब्ध करून देण्यात येत होते.मात्र सद्या ते बंद करण्यात आल्याने घरकूल व वैयक्तिक बांधकाम धारक अडचणीत आले आहेत.

      त्यामुळे तातडीने स्थानिक पात्र लाभार्थ्यांना पूर्ववत परवाने निर्गमित करण्यात यावे,या मागणीसाठी आज निवेदन देण्यात आले‌.

     निवेदन देताना राजेश्वर मुंगमोळे,विजय मुंगमोळे,रामसाय मडावी,येनिदास कवरके,मंगेश टेभूंर्णे, गणेश कूथे,आसीफ शेख,देवानंद लोहबंरे,मयुर दोनाडकर,प्रदिप माकडे आदि हजर होते.