राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित श्रीराम कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी थामिनी राजेंद्र मेश्राम मंदिरटोला नान्नी हिने वाणिज्य शाखेतून ७६ टक्के मिळवीत गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम आली असून तिने गुरुजनांच्या मार्गदर्शनात सातत्यपूर्ण अभ्यास व जिद्द चिकाटीच्या बळावर यश संपादन केले आहे.
तर गेवर्धा येथील विद्यार्थी प्रथमेश कैलास मैद या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्राचार्य व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली कला विभाग मधून ८५ टक्के प्राप्त करीत जिल्ह्यातून द्वितीय येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे त्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थाचालक प्राचार्य व गुरुवर्य व आई वडील यांना दिले आहे.

श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा ही शाळा शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेत असून शैक्षणिक सत्र 2025/ 26 मध्ये माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम आली असून अकरा लाख रुपयाचा बक्षीस सुद्धा त्यांना प्राप्त झाला आहे.
कुरखेडा सारख्या आदिवासी बहुल भागातील विद्यार्थी हे प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत असल्याने कुरखेडा तालुका वासियांचा मान उंचावला असून या गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.



