Home देशविदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सुरेश डांगे सन्मानित….

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सुरेश डांगे सन्मानित….

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी 

     जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने चिमूर येथील कवी,लेखक सुरेश डांगे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले.

      जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे सहावे विश्व साहित्य संमेलन हनोई (व्हिएतनाम) येथे संपन्न झाले.या साहित्य संमेलनात सुरेश डांगे यांना हा पुरस्कार त्यांच्या साहित्य,सांस्कृतिक,शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव व्हावा यासाठी प्रदान केले. 

        सहाव्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध नाटककार डॉ.सुनील रामटेके यांचे हस्ते हा पुरस्कार सुरेश डांगे यांना प्रदान करण्यात आला.

       याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.जगन कऱ्हाडे,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे सदस्य डॉ.राजेश गायकवाड,डॉ.दीपककुमार खोब्रागडे,प्राचार्य डॉ.वैशाली प्रधान,डॉ.अनिल काळबांडे,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.भूपेश पाटील उपस्थित होते.सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

        सुरेश डांगे यांचे सप्तसृजन,तू हसलीस म्हणजे हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.दखल हा ग्रंथ अलिकडेच प्रकाशित झाला आहे.त्यांनी अनेक स्मरणिकांचे संपादन केले आहे.अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत.तपोभूमी या अनियतकालिकाचे ते कार्यकारी संपादक आहेत.

      चिमूर येथे २०१९ मध्ये संपन्न झालेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे सहस्वागताध्यक्ष म्हणून सुरेश डांगे यांनी कार्य केले आहे.

       पूर्व विदर्भात साहित्य संमेलने,कविसंमेलने,ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमांचे आयोजन सुरेश डांगे यांनी केले आहे.मागील अनेक वर्षांपासून सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात ते सातत्याने कार्यरत आहेत.

       सुरेश डांगे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.