जगातील बहुतांशी देशात लोकशाही आहे,याचा अर्थ निवडणुकीतून सत्ता स्थापन होते.यापूर्वी हुकुमशाही किंवा राजेशाही होती.निवडणूक लोकशाही हा प्रकार नव्हता,पहिले आणि दुसरे जागतिक महायुद्धे झाली.ती वसाहतवाद विरोधी राष्ट्रीय युद्धे होती,प्रत्येक देशातील जनतेस परकीय देशांची सत्ता नको होती,स्वकीय देशाचीच सत्ता हवी होती,जागतिक महायुद्ध हे एकाबाजूने स्वराज्यासाठीचे युद्ध होते,तर दुसऱ्या बाजूने साम्राज्यवाद विरोधी लढाई होती,तिसऱ्या बाजूने ते जागतिक भांडवलदारा विरुद्ध देशी भांडवलदारांचे ते युद्ध होते.अशा या तिहेरी उद्दिष्टातून झालेले जागतिक महायुद्धातून लोकशाही जन्मास आली.पण अखेर ती भांडवलदारांच्या च दावणीला बांधल्या गेली.म्हणजेच जगातील आजची लोकशाही ही भांडवलदारा ची बटिक म्हणजे गुलामच आहे.समाज विकासाच्या प्रक्रियेत जगात जेव्हा गुलामीची व्यवस्था होती ( मालक आणि गुलामाची व्यवस्था ) त्यात गुलामांचा बाजार भरायचा,आजच्या जनावरांच्या बाजारासारखा आणि त्या गुलामांच्या बाजारात गुलामांच्या मालकांनी त्या गुलामाची शारीरिक ताकद बघून त्याची खरेदी विक्रीची किंमत व्हायची.असेच आज लोकशाही या गुलामाची खरेदी विक्री निवडणुकीच्या बाजारात भांडवलदार आणि सत्ताधारी करीत आहेत.ज्या जातीची आणि धर्माची ताकद ( लोकसंख्या ) जास्त त्यानुसार त्या जातीला ,त्या धर्माला विकत घेऊन आपली सत्ता स्थापन करायची,असा हा लोकशाहीचा घोडेबाजार चालू आहे.हा घोडेबाजार म्हणजेच लोकशाहीचा खेळखंडोबा होय.यातून हे सिद्ध झाले आहे की,या भांडवलशाही व्यवस्थेत भांडवली लोकशाहीच असेल,म्हणजेच जातींना ,धर्मांना,खरेदी करायचे,ते नाही जमले तर व्यक्तींचे मत पैसे देऊन खरेदी करायचे,निवडून यायचे,सत्तेत जायचे,भरपूर संपती मिळवायची,आणि सत्ता संपती मिळाली की,आपोआप प्रतिष्ठा आणि राजविलास मिळतोच.असे हे समीकरण गणित चालले आहे.
जागतिक समाज व्यवस्था ही वर्गीय व्यवस्था ( गरीब मध्यम श्रीमंत ) आहे.आणि भारतीय व्यवस्था ही जातीय धर्मीय वर्गीय अशी थ्री टायर सिस्टिम ( व्यवस्था ) आहे.इथे जातीच्या लढाया होतात,धर्माच्या लढाया होतात,वर्गीय लढाया पण होतात.कारण व्यवस्थाच तशी आहे,आणि जातीच्या ,धर्माच्या,वर्गाच्या लढाया होत नसतील तर सत्ताधारी त्या घडवून आणतात,कारण निवडून येण्यासाठी ही विषमतेची व्यवस्था आवश्यक आणि पूरक वाटते.म्हणून जात धर्म वर्ग असलेली ही विषमतावादी व्यवस्था कायम राहिली तर सत्तेसाठी आणि सत्ताधाऱ्यांना आणि शोषण पिळवणूक करण्यासाठी भांडवलदार आणि पुरोहित वर्गाला या व्यवस्थेचा फायदा मिळतो,असतो.
म्हणून जाती धर्म वर्ग हे नष्ट न करता मजबूत करण्याचे काम हे भानवलशाही व्यवस्थेत होत असते.म्हणून जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे,असे डॉक्टर आंबेडकर म्हणाले,आणि वर्ग व धर्माचे उच्चाटन केले पाहिजे,असे कार्लमार्क्स नी सांगितले.दोघांचे ध्येय्य एकच होते,ते म्हणजे समतावादी समाज व्यवस्था निर्माण करणे.यासाठी जातीच्या धर्माच्या लढाया करू नयेत,कारण यामुळे सामाजिक धार्मिक विषमता अधिकच पक्की होत जाते.पण वर्गीय लढाया जरूर कराव्यात,कारण यातून आर्थिक विषमतेची रुंदावलेली दरीतील अंतर कमी होते.देशाची संपती केवळ मूठभर भांडवलदार श्रीमंताच्या हाती न राहता ती गरिबाकडे वळती होते.समाजवादी वातावरण तयार होते.यातूनच पुढे साम्यवादी समाजव्यवस्था निर्माण होते,ज्या व्यवस्थेत जाती नसतील,आर्थिक सामाजिक शोषण नसेल,गरीब मध्यम श्रीमंत असे वर्ग पण नसतील.अशा व्यवस्थेतील म्हणजेच समतावादी समतेच्या व्यवस्थेत लोकशाही निरोगी,सुदृढ,निकोप,निस्वार्थी,असेल,त्यामुळे लोकप्रतिनिधी हे समतावादीच निवडून येतील.विषमतावादी लोकप्रतिनिधींचे बस्तान उठलेले असेल.कारण समतावादी व्यवस्थेत लोकांना जात धर्म पैसा महत्वाचा वाटणार नाही.कारण या गोष्टींची त्यांना आवश्यकता पण वाटणार नाही,म्हणून मतदार हा जातीसाठी धर्मासाठी वर्गासाठी लढाई करणारच नाही.समतावादी व्यवस्थेत धर्म हा व्यक्तिगत बाब असणार असला तरी,त्याचे प्रदर्शन करण्याची गरजच पडणार नाही.धर्माचे जातीचे वर्गाचे प्रदर्शन करण्याची गरज ही सत्ताधाऱ्यांची असते.समतावादी व्यवस्थेत ही गरज नष्ट होते.म्हणून राजकीय लोक पण या लढाया करणार नाहीत.
आज जाती धर्म वर्ग यांच्या ज्या लढाया चालू आहेत,याचा दोष कुणाला देता येत नाही.तर यास कारणीभूत संपूर्णतः आजची विषमतेची विषमतावादी आर्थिक सामाजिक व्यवस्थाच आहे.ही व्यवस्थाच मुळासकट उपटून काढणे आणि सर्वच मानवजात सुखी समृद्ध आनंदी चिंतामुक्त करणे गरजेचे आहे.


