Home Social “शब्दांनी ज्याचे कौतुक करावे असेच व्यक्तिमत्व,अश्या शब्दात केले प्रा.राजश्री पाटील यांनी चंद्रपूरच्या...

“शब्दांनी ज्याचे कौतुक करावे असेच व्यक्तिमत्व,अश्या शब्दात केले प्रा.राजश्री पाटील यांनी चंद्रपूरच्या प्रियंका चिताडे यांचे अभिनंदन!

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

        “शब्दांनी ज्यांचे कौतुक करावे असे आपले व्यक्तिमत्व,अश्या शब्दात प्रा.राजश्री पाटील यांनी चंद्रपूरच्या प्रियंका चिताडे यांचे ‘राणी सखी मंच’च्या मुख्य संयोजिका पदी निवड झाल्या बद्दल एका पाठवलेल्या संदेशातून अभिनंदनाला अनुसरून केले आहे.

       पाटील या सुरतच्या प्रख्यात साहित्यिक असून त्यांनी आज पावेतो अनेक वृत्तपत्रे व मासिकांतून नियमितपणे लिखाण केले आहे.

      आपल्या कार्याने आपण समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.या नवीन जबाबदारीच्या माध्यमातून आपल्या हातून अधिक उत्तम समाजसेवा घडो अशी अपेक्षा देखील त्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे.

        तुमची जिद्दआणि सामाजिक कार्याची ओढ अशीच कायम राहो! असं संदेशात नमूद करत पुढील यशस्वी वाटचालीस प्रा. राजश्री पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.