बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
बिजवडी तालुका माळशिरस येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह भ प मंगेश महाराज देशमुख तोंडले यांची चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा गोड आणि मधुर आवाजात संपन्न झाली.
बिजवडी येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने सालाबाद प्रमाणे तिसाव्या वर्षीही श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह बिजवडी तालुका माळशिरस येथे चालू असून
मंगळवार दिनांक 7 /04 /2026 यावेळी अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला तर शेवटी दिनांक 14 /04 /2026 रोजी सकाळी दिंडी व ग्राम प्रदक्षिणा घेऊन. 10 ते 12 या वेळेत श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याला दररोज उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. हजारो भाविक भक्त आणि श्रोते यांची उपस्थिती लाभत आहे.
बिजवडी ग्रामस्थांच्या वतीने या ही वर्षी मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा होत असून हजारो भाविक भक्त, वाचक, सूचक, टाळकरी, विणेकरी, श्रोते व ग्रामस्थ आणि महिला भगिनी या सेवेचा रोज लाभ घेत आहेत.
अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा ह भ प मंगेश महाराज देशमुख तोंडले यांच्या कीर्तन सेवेने भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
हर रोज सकाळी हरिनामाच्या अखंड गजराने परिसर दुमदुमून गेला. तर संध्याकाळी झालेल्या कीर्तन सेवे प्रसंगी ह भ प मंगेश महाराज देशमुख यांनी अभंग, गाथा आणि हरिनाम महात्म्य यावर प्रभावी निरूपण केले. त्यांच्या तेजस्वी वाणीतून समाज प्रबोधनाचा संदेश देताना नामस्मरणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
कीर्तना दरम्यान टाळ-मृदुंगाच्या गजरात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. परिसरातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, विविध संस्थांचे चेअरमन सह टाळकरी, विणेकरी, मृदुंग वादक, पंचक्रोशीतील भाविक भक्त, समस्त ग्रामस्थ बिजवडी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
बिजवडी ग्रामस्थांच्या वतीने अन्नदान व महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले . या अखंड हरिनाम गाथा पारायण सोहळ्यामुळे गावात भक्तीभाव आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अखंड हरिनाम सप्ताहासाठी चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सप्ताहाच्या सुरुवाती पासून ते शेवटी पर्यंत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ह.भ.प सुरेश महाराज भोरे करीत आहेत.



