भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
गडचिरोली :- दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य शिवसेना माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, महिला संघटिका माजी बांधकाम सभापती छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्य करणारे नवनाथ उके यांचे कडून गडचिरोली तालुक्यातील बेलगांव येथील उर्मिला राजेंद्र भुरसे यांचे पति दीर्घ आजाराने मरण पावले.
त्यांची घरची परिस्थिती गंभीर असल्याने आणि घरचा कर्ता पुरुष गेल्यावर त्यांच्या मनावर आलेला परिणाम, समोर 2 मुलीच शिक्षण घरात आर्थिक अडचण यामुळे त्यांचे मन चिंतेने ग्रासले होते ही गोष्ट नवनाथ उके सामाजिक कार्यकर्ते यांना माहिती झाल्यावर नवनाथ उके सामाजिक कार्यकर्ता (शिंदे गट) गडचिरोली कडून आर्थिक मदत करण्याचे ठरवले त्यानुसार उके यांनी मदत केली.
यावेळी संदीप भाऊ भुरसे, राहूल भाऊ सोरते, अशोक भूसारी, विलास पोटावी, पितांबर सोरते, केशव पिपरे, सुनिल कन्नाके, शामराव भांडेकर, रामदास कोठारे, विनायक भांडेकर, निलकंठ पिपरे, श्रीकृष्ण वासेकर, रोशन धोडरे, अविनाश वासेकर, रितीक चापडे, भाष्कर लटारे, सर्वदास भुरसे, विजय भुरसे, ज्योती भांडेकर, संगिता राऊत, अर्चना राऊत, संगिता धोडरे, पुष्पाताई भुरसे, सोनी भांडेकर, सरिता भांडेकर, डिंपल भुरसे, प्रियंका भुरसे, सुंदराबाई धोडरे, कमलाबाई वासेकर, जनाबाई राऊत, अक्षय भुरसे आणि समस्त गावातील नागरिक उपस्थित होते.यामुळे त्या कुटुंबाना आर्थिक मदतीमुळे पाठबळ मिळाले त्यामुळे त्यांनी त्यांचे आभार मानले.



