रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :– स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या द्वारे सामाजिक समता सप्ताह निमित विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची१३५ वी जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्ष महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल बन्सोड होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरु व शिष्याचे नाते उलगडून दाखविले.
प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षक सुरेश राऊत होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षणाचा उपयोग समाजसुधारणेसाठी करावा. भारतीय संविधान व ग्रामगीता यांच्यावर त्यांनी प्रकाश टाकला. दुसरे अतिथी सहाय्यक शिक्षक महेंद्र लोखंडे होते. त्यांनी महात्मा जोतीराव फुले यांचे सामाजिक कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकरानी पूर्ण केले. विद्यार्थ्यानी सर्व महापुरुषांची चारित्रे वाचली पाहिजे. असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.हरेश गजभिये व डॉ.विजय बनकर यांच्या पर्यटन विपणन या पुस्तकांचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.गुणवंत वाघमारे,प्रस्ताविक विद्यार्थी विकास विभाग् प्रभारी डॉ. नितिन कत्रोजवार यांनी केले.
आभार रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे यांनी केले. यावेळी डॉ.कार्तिक पाटील,डॉ. हरेश गजभिये,डॉ.लक्ष्मण कामडी, डॉ.उदय मेंदुलकर, डॉ. आशुतोष पोपटे, कनिष्ठ महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा. राकेश कुमरे, प्रा.रोशन कुमरे, प्रा.गजानन चव्हाण, प्रा.रिना भोयर, प्रा.निलिमा तुराणकर,प्रा.वर्षा मेश्राम,प्रा.शितल वानखेडे, प्रा.रुपाली बरडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



