Home देशविदेश भेदभाव : आर्थिक आणि सामाजिक…

भेदभाव : आर्थिक आणि सामाजिक…

           भेदभाव म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना, उच्चनीचतेची भावना,हीन दर्जाची आणि प्रतिष्ठेची भावना, तुछतेची, तिरस्काराची,द्वेषाची भावना,अहंकाराची भावना आणि विचार.

           खरे तर सारी माणसे शारीरिक अवयवाने,रचनेने,शरीराने सारखीच असतात,साऱ्यांनाच बुद्धी असते ,विचार असतात.साऱ्यांनाच मन असते,भावना असतात.तरी पण सर्व माणसांना सारखे समजल्या जात नाही.समानता,समता,एकता,सहिष्णुता,समरसता,एकात्मता ,स्वातंत्र्य,बंधुभाव, समान न्याय ही मानवी मूल्य साऱ्यांना लागू होत नाहीत.अशी येथील विषमतेची व्यवस्था आणि प्रत्येक माणसाची मानसिकता आहे.

           आर्थिक क्षेत्रात माणूस माणुसकी सोडतो,दया क्षमा शांती,सत्य न्याय नीती प्रेम या माणुसकीच्या गोष्टी विसरून स्वार्थी माणसे निस्वार्थी माणसांचे आर्थिक शोषण, पिळवणूक करतात.श्रमिकांना वेठीस धरून त्याच्या परिस्थितीचा गैर फायदा घेतात,अधिक वेळ काम करून घेऊन कमी पैसे देतात,उत्पादक कमीत कमी पैश्यात जास्तीत जास्त उत्पादन काढून,ते जास्तीत जास्त किमतीला विकून,भरपूर नफा कमावतात,त्यातून भांडवल संचय करून,एका कारखान्याचे,एका उद्योगाचे अनेक उद्योग निर्मिती करून त्यातही भरपूर नफा कमवून,कामगाराची पिळवणूक करून गर्भश्रीमंत,भांडवलदार होतात,मूठभर भांडवलदार आणि असंख्य श्रमिक असे दोन वर्ग समाजात निर्माण होतात.देशाची सारी संपती मुठभरांच्या हाती असते.

        यातून गरीब श्रीमंत मध्यम असे वर्ग निर्माण होऊन आर्थिक विषमता निर्माण होते.या विषमतेतील तळातील वर्ग म्हणजे भिकारी,त्या वरचा वर्ग म्हणजे निराधार निराश्रित वर्ग,त्यावरचा वर्ग म्हणजे दारिद्य्र रेषेखालचा वर्ग,त्यावरचा वर्ग म्हणजे गरीब वर्ग,त्यावरचा वर्ग म्हणचे कनिष्ट मध्यम आणि वरिष्ठ मध्यम वर्ग,ज्यात प्रथमश्रेणी,द्वितीयश्रेनी,तृतीयश्रेणी,चतुर्थश्रेणी असे चार स्तरीय मध्यम वर्ग आहे.त्याच्या वरचा वर्ग म्हणजे कनिष्ट श्रीमंत, वरिष्ठ श्रीमंत,त्यावरचा वर्ग म्हणजे जमीनदार आणि भांडवलदार,भांडवलदार वर्गात कनिष्ट भांडवलदार म्हणजे देशी भांडवलदार आणि वरिष्ठ भांडवलदार म्हणजे जागतिक भांडवलदार असे हे आर्थिक स्तर वरिष्ठाने कनिष्ठाची पिळवणूक करून निर्माण झालेले.

          वरिष्ठ कनिष्ठात भेदभाव असतो.जसे जातीभेदात रोटीव्यवहार आणि बेटी व्यवहार होत नाही,त्याच प्रमाणे श्रीमंत वर्गाचा माणूस गरिबाच्या पंक्तीत बसून जेवत नाही.घरी गरिबांचे जेवण निकृष्ट असते,तर श्रीमंतांच्या घरचे जेवण शाही जेवण असते.गरिबांच्या मुलांच्या शाळा,गरिबांचे दवाखाने यात भेदभाव दिसतो.शिक्षण आरोग्यात समानता नसते.श्रीमंत गरीबांना आपल्या मुली देत नाहीत,लग्नासाठी.सार्वजनिक ठिकाणी श्रीमंतना बसायला खुर्ची दिल्या जाते.गरीब खाली बसतो.ही उच्चनीचता ,श्रेष्ठ कनिष्ठ पण आर्थिक क्षेत्रात असते.सारा मानपान,प्रतिष्ठा ,सुखसोयी श्रीमंतस मिळतात.प्रतिष्ठा गरिबास मिळत नाही.पदोपदी अपमानित जीवन जगावे लागते.

       असेच चित्र सामाजिक क्षेत्रात पण आहे.जातीची उतरंड आणि त्यात श्रेष्ठत्व कनिष्ठत्व,उच्चनीचता,अस्पृश्यता या गोष्टी आहेत. निच जातींच्या लोकांना समान वागणूक दिली जात नाही,खाजगी आणि सार्वजनिक ठिकाणी पण प्रतिष्ठा मिळत नाही.दर्जाची समानता नसते.अस्पृश्य जातींना अजूनही धार्मिक ठिकाणी दूरच ठेवल्या जाते.भंडाऱ्याचे जेवणात पण यांची शेवटची पंगत आणि तीही खालच्या जागीच असते.देवळात प्रवेश नसतो,अशी खेड्यात परिस्थिती आहे.अजूनही ,समानतेचा आणि atrociti कायदा होऊनही.अजूनही दलितांवरील अत्याचार थांबले नाहीत,याचे कारण भेदभावाची ही सामाजिक व्यवस्था आणि निष्क्रीय सरकार होय.किंवा विषमतावादी सरकार होय.

       आर्थिक भेदभाव म्हणजे वर्गीय व्यवस्था होय.सामाजिक भेदभाव म्हणजे जातीय व्यवस्था होय.ही भेदभाव आधारित व्यवस्था नष्ट करायची असेल तर वर्गविहीन समाजरचना आणि जातीविहीन समाज रचना निर्माण करावी लागेल.हे शक्य आहे.फक्त अडचण आहे, ती म्हणजे आपण समतेचा समानतेचा विचारच करीत नाही.या विचाराचे लोक संघटित होत नाहीत.संघर्ष करीत नाहीत.

             लेखक

            दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : नऊ एप्रिल 2026, फोन : 9420912209