राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यशापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागत नाही. हेच ध्येय उराशी बाळगलेल्यांना परिस्थिती कधीच आडकाटी बनू शकत नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे गेवर्धा येथील साधारण कुटुंबातील सुमेध खुशाल रामटेके व प्रवीण पैकू कुलमेथे यांची गडचिरोली पोलिस विभागात महाराष्ट्र पोलीस म्हणून झालेली निवड.
सुमेध खुशाल रामटेके चे वडील तहसील कार्यालयाबाहेर अर्जनवीस चे काम करत असल्याने आर्थिक परिस्थिती साधारण होती.त्यामुळे त्यांनी मुलाचे प्राथमिक शिक्षण गेवर्धा येथील जिल्हापरिषदेच्या शाळेमध्ये तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे श्रीराम महविद्यालय कुरखेडा येथे पुर्ण केले.
प्रवीण पैकू कुलसेंगे हा लहान असताना त्याचे वडीलाचे छत्र हरवले,मोल मजुरी करून आईने प्रवीण चा सांभाळ केला. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेत गेवर्धा शाळेमध्ये व माध्यमिक शिक्षण आदर्श महाविद्यालय वडसा येथे दिले.
लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सुमेध व प्रवीण ने उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पोलिस विभागाची तयारी करण्याचे ठरवले. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने अनेक दिवस त्यांनी घरी राहून अभ्यास व मैदानावर सराव केला. यानंतर ते गडचिरोली येथे अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत व इतर मित्रांचे सोबत मैदानावर सराव करत होते.
नुकत्याच घेण्यात आलेले महाराष्ट्र पोलीस भरती साठी सुमेध व प्रवीण यांनी अर्ज केला होता त्या अनुषंगाने दोघांनी तयारीदेखील पूर्ण केली होती.फिजिकल व परीक्षा दिल्यानंतर त्यांचे लक्ष निकाला कडे लागून होतें ,8 एप्रिल 2026रोजी निकाल लागल्यानंतर अंतिम निवड यादीमध्ये सुमेध व प्रवीण यांची अखेर निवड झाली.
महाराष्ट्र शासन पोलीस विभाग गडचिरोली द्वारे झालेल्या भरतीमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये दोघांनी पोलीस बनण्याचे पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात खरे उतरवले.सुमेध ने अनेक गरजवंताना रक्तदान तसेच इतर मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, त्यांच्या निवडीबद्दल संकल्प फाउंडेशन समाजसेवी संस्थेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवून त्यांचं अभिनंदन करण्यात आले.
यावेळी खुशालजी रामटेके,डॉक्टर जगदीश बोरकर ,लोकेश ठाकरे, जितेंद्र वटी, अतुल अंबादे ,फलिंद्र मांडवे ,राहुल पाटणकर, वेद बोरकर, चंद्रकला रामटेके,बाळाजी नखाते ,आदी मान्यवर उपस्थितीत होते. महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये सुमेध व प्रवीणच्या निवडीबद्दल संपूर्ण गावातील प्रतिष्ठित मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या यशाचे अभिनंदन केले.त्यांचे यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सुमेध व प्रवीण यांनी आपले यशाचे श्रेय आई-वडील व मित्र परिवाराला दिलेले आहे.



