भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
स्थानिक धानोरा- येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारा ‘समता सप्ताह’ उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पंकज चव्हाण यांच्या शुभहस्ते परमपूज्य,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी डॉ.विणा जम्बेवार, डॉ.गणेश चुदरी, डॉ. पंढरी वाघ, डॉ.राजू किरमीरे, प्रा.ज्ञानेश बनसोड, डॉ.नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा.प्रशांत वाळके, डॉ.सचिन धवनकर, डॉ. संजय मुरकुटे, डॉ.प्रियंका पठाडे (रासेयो कार्यक्रम अधिकारी),डॉ.प्रवीण गोहणे,प्रा. कैलाश खोब्रागडे,प्रा. निवेदिता वटक, प्रा.भाविकदास करमनकर, प्रा.विराग रणदिवे, प्रा.संजय मांडवगडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी प्रशासकीय कर्मचारी आणि रासेयो स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान मूल्यांचे जागर करून सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सामूहिकपणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.संविधानाने आपल्याला दिलेले हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देत समाजात समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून दिनांक ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ पर्यंतचे विविध कार्यक्रमाची रूपरेषा संचालन व प्रास्ताविक मनोगतातून डॉ प्रियंका पठाडे यांनी विशद केली तर आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण गोहणे यांनी व्यक्त केले.



