Home Maharashtra चिमूर तालुक्यात गॅस सिलेंडरचा तुडवडा नागरिक हैराण :- शिवसेना तालुका प्रमुख विलास...

चिमूर तालुक्यात गॅस सिलेंडरचा तुडवडा नागरिक हैराण :- शिवसेना तालुका प्रमुख विलास डांगे… — गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरूच…  — अवैधरित्या केला जातो गॅस सिलेंडरचा वापर…

उपक्षम रामटेके

   मुख्य संपादक

चिमूर :- चिमूर तालुक्यात गॅस सिलेंडर तुटवडा निर्माण झाला असून नागरिक व गृहणी मात्र हैराण झालेल्या आहेत.गॅस सिलेंडरच्या काळाबाजारामुळे महिलाची डोकेदुखी वाढली.मात्र व्यवसायीक घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग करून व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते आहे.मग व्यवसायीकांना सिलेंडर देतो तरी कोण? असा प्रश्न,” गॅस सिलेंडर साठी सकाळ पासून संध्याकाळपर्यंत लाईन उभे असलेले गॅस सिलेंडर ग्राहक करीत असल्याचे दिसून आले आहे.

            सरकार कडून वारंवार सांगितले जाते की,गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही.मग ही जनतेची फसवणूक केली जात नाही का? असा प्रश्न विलास डांगे चिमूर शिवसेना तालुका प्रमुख यांनी उपस्थित केला आहे.चिमूर तालुक्यात अनेक रिसॉर्ट आहेत,गेली 6-3-2026 पासून कमर्शियल गॅस सिलेंडर बंद आहेत.मात्र रिसॉर्ट अजूनही सुरु असून तेथील किचन रुम बंद नाहीत.मग ते कमर्शियल गॅस सिलेंडर कि घरगुती गॅस सिलेंडर वापरतात याची चौकशी झाली पाहिजे. 

          तसेच लग्न,वास्तू पूजन,वाढदिवस,रिसेप्शन या सारखे कार्यक्रम सुरु आहेत.त्या ठिकाणी कॅटर्स कडून स्वयंपाक करुन घेतला जात आहे. 

           यात अनेक व्यवसायिक कमर्शियल गॅस सिलेंडर ऐवजी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करीत आहेत.तसेच अनेक हॉटेल व्यवसायिक सुद्धा घरगुती सिलिंडरचा वापरत आहेत.त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे,तुटवडा सगळीकडे आहे.

           परंतु संबंधित यंत्रणेने प्रत्येक कार्यक्रम स्थळी चौकशी करुन गैरकायदेशीर वापर करणाऱ्या व्यक्ती विरोधात कार्यवाही करावी,जेणेकरून घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही…