Home Social समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समिती, चंद्रपूर तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन….

समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समिती, चंद्रपूर तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन….

 प्रेम गावंडे

 उपसंपादक

दखल न्युज भारत

              समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समिती, चंद्रपूर तर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती प्रित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        यामध्ये आरोग्य तपासणी, रोगनिदान तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे सर्व कार्यक्रम गंध कुटी बुद्ध विहार ,मुल रोड MEL डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ, चंद्रपूर येथे रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 ला सकाळी 9.00 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

            त्यात बालरोग तज्ज्ञ, नेत्र तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, दंत चिकित्सक, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, चर्म रोग तज्ञ, अस्थी रोग तज्ञ, जनरल फिजिशियन यांची निःशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर देखील आयोजित केले आहे.. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहुन सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजका तर्फे करण्यात येत आहे.