Home देशविदेश श्रद्धा,आस्था,आणि सत्य….

श्रद्धा,आस्था,आणि सत्य….

       श्रद्धा आणि अंधश्रद्धा,आस्था आणि अनास्था,यागोष्ठी मानवी भावना होत.प्रत्येक माणूस जन्मतःच श्रद्धा आणि आस्था सोबत घेऊन येत नसतो,तर ज्या कुटुंबात आणि समाजात आणि वातावरणात आणि परिस्थितीत जन्म होतो,त्याच्या संस्कारातून त्याचे ठिकाणी म्हणजे विचार भावनेत श्रद्धा,अंधश्रद्धा,आस्था,अनास्था निर्माण होत असतात.प्रथम आई,नंतर बाप,नंतर घरातील मोठी भावंडे आणि मोठी माणसे जसा विचार करतात,आणि जसे त्यांचे वर्तन असते,त्याचे अनुकरण लहान मुले करतात,किंवा तसे त्यांना करायला शिकविल्या जाते.याचा अर्थ संस्काराचा परिणाम म्हणजेच श्रद्धा अंधश्रद्धा,आस्था की अनास्था या गोष्टी होत.

     अर्थातच लहानपणीचे संस्कार जर चुकीचे ,निरर्थक,अयोग्य,असत्य,जीवनाला धोक्याच्या मार्गाकडे नेणारे असतील,असे संस्कार की,ज्यामुळे माणसाची आर्थिक नुकसान होत असेल,सामाजिक संघर्ष होत असेल,श्रद्धा आणि आस्थेच्या नावाने कुटुंबाचे,देशाचे,जगाचे वातावरण गढूळ होत असेल,सामाजिक सौहार्द,सलोखा,मैत्री,सहयोग,प्रेम यात अडसर होत असेल,सामाजिक माहोल बिघडत असेल,तर अशावेळी श्रद्धा आणि आस्था या चुकीच्या आहेत की बरोबर आहेत ? योग्य की अयोग्य ? सत्य की असत्य ? न्यायी की अन्यायी ? समाज प्रगतीस पूरक की अडसर ? या कसोटीवर आस्था तपासल्या पाहिजेत,काळाची ती गरज होऊन बसते.कारण आस्था श्रद्धा मुळे जर सामाजिक आर्थिक राजकीय वातावरण गढूळ होत असेल,नुकसानदायी होत असेल,तर अशा श्रद्धा आणि आस्था बाळगायच्या की सोडायच्या ? हा प्रश्न निर्माण होतो.माणसाचे जीवन आणि ते जगणे सुखकर आनंदी व्हावे म्हणूनच चांगले संस्काराची आवश्यकता आहे.परंतु ज्यास आपण चांगले संस्कार म्हणतो,उदा.लहानपणीच आपण मुलांवर देवाचे आणि धर्माचे संस्कार घालतो,देवाचे धर्माचे महत्त्व आणि आवश्यकता सांगणाऱ्या गोष्टी ,गाणी,खेळ,भजन,कीर्तन,पोथी पुराण याचे शिक्षण देतो,यातून लहान मुलांच्या श्रद्धा आणि आस्था पक्क्या होतात.तसे त्याचे विचार आणि भावना निर्माण होतात,तेच सत्य मानून आपले उभे आयुष्य मुले जगतात.इथपर्यंत ठीक आहे,परंतु जेव्हा वेगवेगळ्या दोन आस्था श्रद्धा यांचेत भांडणे झगडे आणि त्यातून मालमत्ता आणि जीवित ची भयंकर हानी होते,हिंसाचाराचा आगडोंब उसळतो,अनेकांचे जीव जातात,तेंव्हा देव आणि धर्माच्या आपल्या श्रद्धा आणि आस्था तपासण्याची आवश्यकता पडते,त्या बरोबर की चूक,योग्य की अयोग्य,चांगल्या की वाईट,सुखकर की दुखकर,सत्य की असत्य, त्या पाळणे फायदेशीर की हानिकारक ,या बाबीचा विचार करणे कर्मप्राप्त होऊन बसते.अशा मोड वर म्हणजे अशा वळणावर जर आपण सावध नाही झालो,आपलेच खरे म्हणून हट्ट धरून बसलो,तर यात इतरांचे तर नुकसान आहेच ,पण आपले पण नुकसान आहे,याचे भान असणे जरुरीचे आहे.अशा कठीण प्रसंगी म्हणजेच जिथे सारा विनाश आणि सत्यनास होणार आहे,ज्या गोष्टीमुळे ( देव धर्म ) साऱ्यांचेच भयानक नुकसान होणार आहे,हिंसाचार भडकणार आहे,लाखो लोकांचे जीव जाणार आहेत,करोडो रुपये ची मालमत्ता नष्ट होणार आहे,अशा वळणावर आपल्या आस्था तपासणे जरुरीचे आहे.संघर्षाचे मूळ जर देव आणि धर्म असतील तर त्यावर श्रद्धा आस्था ठेवायची की नाही ? हे ठरविले पाहिजे.देव आणि धर्म म्हणजे काय ? त्यांची व्याख्या आणि व्यवहार तपासणे जरुरीचे होते.जर यात काही अर्थ असेल,त्यात काही सत्य असेल तर मग या गोष्टींचा वापर केंव्हा कुठे कसा करायचा ? याची स्पष्टता करून घेणे अगत्याचे आहे.आणि देव आणि धर्म या गोष्टीला काहीच अर्थ नसेल,त्यात काही तथ्यच नसेल,त्याचे काही अस्तित्वच नसेल,त्यांचा काही उपयोगच नसेल,किंवा या गोष्टी नसल्यामुळे किंवा त्यावर विश्वास नाही ठेवल्यामुळे आपले काहीच बिघडणार नसेल,किंवा नुकसान होणार नसेल तर मग सध्या भांडणाचे कारण असलेल्या किंवा भांडणाचे कारण ठरलेल्या या गोष्टी पाळायच्या तरी कशासाठी ? देव आणि धर्म या गोष्टीना आपल्या आस्था श्रद्धा म्हणून तरी का पाळायच्या ? असा विचार होणे ही वर्तमान काळाची गरज आहे.

     शिवाय यातील सत्य शोधणे हा तर कायम तोडगा आहे.पण यासाठी आपली तयारी हवी.

             लेखक

            दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक: 27 मार्च 2026.फोन: 9420912209.