Home Social चंद्रपूरात रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा!…

चंद्रपूरात रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा!…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

         चंद्रपूर येथील स्थानिक समाधी वार्डातील काळाराम मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघाली.या शोभायात्रेचे आयोजन श्री काळाराम मंदिर व श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने करण्यात आले होते.

          सदरहु शोभा यात्रेत सामाजिक संस्था,भजन मंडळ व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

             शोभायात्रेच्या निमित्ताने अनेक लक्षवेधक देखावे सादर करण्यात आली होती तर काही मंडळांच्या वतीने प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

           शोभायात्रा बघण्यासाठी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची अलोट गर्दी लोटली होती.आज सकाळपासूनच चंद्रपूर शहराचे वातावरण भक्तिमय झाले होते.

           शोभायात्रा दरम्यान कायदा, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी चंद्रपूर पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

          शोभायात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर ठिकाणी ठिकाणी राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या.