Home Social ४४ वर्षांनी आले एकत्र दहावीचे बालमित्र “सोशल मिडीया” ने आणले जवळ, साकोलीत स्नेह...

४४ वर्षांनी आले एकत्र दहावीचे बालमित्र “सोशल मिडीया” ने आणले जवळ, साकोलीत स्नेह मिलन सोहळा संपन्न….

निलय झोडे 

 उपसंपादक

दखल न्युज भारत 

साकोली : सन १९८२ मध्ये टिळक विद्यालय खंडाळा येथील दहावी शिकून दुरावले गेलेल्या विद्यार्थ्यांना अखेर सोशल मिडीयाने परत एकत्र केले आहे. यांचा स्नेह मिलन सोहळा ( शुक्र. २० मार्च ) ला साकोलीत संपन्न झाला. विशेष म्हणजे ४४ वर्षांनंतर सर्वांचा बदललेला चेहरा एकमेकांना पाहून पण चटकन बालमित्र ओळखून घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी गहिवरून आले होते. 

              या स्नेह मिलन सोहळ्यात मंचावर या विद्यार्थ्यांना शिकविणारे ज्येष्ठ शिक्षक डी. के. राखडे, जे. पी. बोरकर, निमंत्रित अतिथी पत्रकार मनिषा काशिवार, आशिष चेडगे हे उपस्थित होते. प्रास्ताविकात लुंगाराम करंजेकर यांनी सांगितले की, हे सर्व घडले आहे सोशल मिडीयाच्या विविध एप्समुळे की फेसबुक व व्हाट्सअप माध्यमातून दुरावले गेलेल्या सर्व मित्रांना आज एकत्र आणले आहे. आणि निरंतर हा स्नेह मिलन सोहळा दरवर्षी साजरा केला जाईल असे प्रतिपादन केले. तब्बल ४४ वर्षांनंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि विविध ठिकाणी राहतात. पण या सोहळ्याला सर्व आपल्या कुटुंबांसह उपस्थित झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे गुरूवर्य शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार गौरव केला. प्रसंगी सर्वांनी आपला परीचय, माहिती, कार्यक्षेत्र, परीवाराची माहिती संभाषणात सांगितली आणि त्या काळातील वर्गात होणा-या हास्यास्पद घटनांची येथेही पुनरावृत्ती होत एका शाळेच्या वर्गासारखे वातावरण निर्माण झाले होते हे विशेष. स्नेह मिलन सोहळ्यात संचालन प्रभाकर करंजेकर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर बडवाईक यांनी मानले. 

            हा सोहळा आयोजीत करण्यासाठी माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर कापगते, जगन्नाथ गि-हेपुंजे, लुंगाराम करंजेकर, रामकृष्ण निर्वाण, दिगंबर फटींग, त्रिभुवन मेश्राम, प्रभाकर दोनोडे, अरूणा भेंडारकर, सुरदास कापगते आणि ३५ विद्यार्थी विद्यार्थिनींनी विशेष सहकार्य केले. शेवटी वन्दे मातरम् ने या अभिनव सोहळ्याची सांगता करीत सर्वांना निरोप देण्यात आला.