Home Vidarbha RO वॉटर ATM शुभारंभ आणि लोकसहभागातून वॉटर कॅनचे वाटप…

RO वॉटर ATM शुभारंभ आणि लोकसहभागातून वॉटर कॅनचे वाटप…

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

        ग्रामपंचायत गेवर्धा अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावातील नागरिकांना ग्रा.पं. चे वतीने शुद्ध पिण्याची पाण्याची सुविधा निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेऊन मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या शुभ पर्वावर आर. आर. (आबा ) पाटील सुंदर गाव स्पर्धा अंतर्गत RO वॉटर ATM आणि लोकसहभागातून वॉटर कॅनचे वाटप शुभारंभ प्रशासक सौ. सुषमा मडावी यांचे हस्ते करण्यात आले.

        याप्रसंगी प्रशासक समिती सदस्य रोशन सय्यद,हेमंत सिडाम,आशिष टेमूर्णे, ग्रामविकास अधिकारी देवानंद भोयर, पो.पा.भाग्यरेखा वझाडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई,ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे,ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम, माजी सरपंच सय्यद, तंटामुक्ती सदस्य चरणदास मडावी,योगेश नखाते, वसंता चन्ने, विनायक कुथे,दिलीप कांबळे, राजु रामटेके, भगवान दुफारे, नामदेव नखाते, महादेव मस्के,नाजूक कुथे, अताउल्ला पठाण, श्रीराम कोल्हे, देवराव राऊत,गुणवंत सिडाम, दिलीप कुमरे,सुनील नहामुर्ते, तिलक बोरकर, सदानंद कंगाली,जसवंत नहामुर्ते, ग्रा.पं.कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे, विनोद गावळे,धानेश्वर मस्के,अमिता नाहामूर्ते आदी उपस्थित होते.या RO वाटर ATM चा उपयोग गावातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत पदाधिकारी यानी केले आहे.