Home Social विनोदामुळे तणाव कमी होवुन आनंद निर्माण होतो, मूनघाटे महाविद्यालयात आयोजित झाडीपट्टी नाट्य...

विनोदामुळे तणाव कमी होवुन आनंद निर्माण होतो, मूनघाटे महाविद्यालयात आयोजित झाडीपट्टी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेत प्रा.नागपूरकर यांचे प्रतिपादन…

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         नाट्य कलेत विनोद हा नाटकाचा प्राण असून नाटकामधील प्रेक्षकांना हसवण्यासाठी व मनोरंजन करण्यासाठी किंवा एखाद्या सामाजिक मानसिक सत्याला हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यासाठी वापरला जाणारा विनोद घटक हा सर्वांना हवाहवासा असतो नाटकातील विनोदामुळे नाटक अधिक आकर्षक आणि रसपूर्ण बनते व प्रेक्षकांना विनोद हवाहवासा असतो. त्यामूळे जीवनात तणाव कमी होऊन जिवन आनंदी होते असे प्रतिपादन झाडीपट्टीतील नव्या उमेदीचे विनोदी नाट्य कलावंत प्रा.विनोद नागपूरकर यांनी केले.

           ते दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक कार्य विभाग,महाराष्ट्र राज्य आयोजित वीस दिवसीय झाडीपट्टी नाट्य कला प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे यावेळी आज दि १९ मार्च रोजी कार्यशाळेत नाट्य विनोद या विषयावर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा नागपूरकर बोलत होते. 

          यावेळी व्यासपीठावर झाडीपट्टी नाट्य प्रशिक्षण समन्वयक प्रा.डॉ.गुणवंत वडपल्लीवार, प्रा. प्रशांत बनसोड उपस्थित होते.

       कार्यशाळेत नागपूरकर यांनी प्रत्यक्ष विनोदी पात्र रंगवून शिबिरार्थींना विनोदाचे महत्व पटवून सांगितले नाट्यकलेत विनोद मनोरंजनाचे प्रभावी साधन असून नाटकातील विनोद हा थकवा कंटाळा तणाव दूर करतो अशी माहिती देऊन विधार्थींना झाडीपट्टी नाट्य रंगभूमीचा इतिहास विद्यार्थ्यांना पटवून सांगीतला झाडीपट्टी व्यावसायिक नाट्य रंगभूमी च्यामाध्यमातून आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असून झाडीपट्टीतील हजारो कुटुंब नाट्यकलेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत अशी माहिती प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना त्यानी दिली. 

         यावेळी नाट्य कलावंत विनोद नागपूरकर यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन आयोजकांचा वतीने सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार समन्वय प्रा.डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी मानले.