Home Maharashtra धर्मवीर संभाजी महाराजांना तुळापूर येथे अभिवादन…. — उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...

धर्मवीर संभाजी महाराजांना तुळापूर येथे अभिवादन…. — उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती; विकासकामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पुणे : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तुळापूर येथील समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी समाधीचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

        या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, वढू बु. चे सरपंच कृष्णा आरगडे तसेच तुळापूरच्या प्रशासक सरपंच ॲड.गुंफा इंगळे आदी उपस्थित होते.

         यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसमवेत सहभाग घेतला. तसेच तुळापूर येथील संगमस्थळी जाऊन संगमेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले. दरम्यान, तुळापूर स्मारकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत, ही कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.