Home Social नवोदय परीक्षेत सिंदेवाहीचा अंशुमन चमकला; जिल्ह्यात ओबीसीत 4 था क्रमांक… —...

नवोदय परीक्षेत सिंदेवाहीचा अंशुमन चमकला; जिल्ह्यात ओबीसीत 4 था क्रमांक… — अंशुमन कोल्हेचा मोठा यशस्वी प्रवास; मेहनतीच्या जोरावर नवोदयमध्ये झेंडा… — प्राजक्ता विद्या मंदिरचा विद्यार्थी जिल्ह्यात चमकला; अंशुमनवर कौतुकाचा वर्षाव…

   अमान कुरेशी

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

     दखल न्यूज भारत 

सिंदेवाही :- शहरातील प्राजक्ता विद्या मंदिर येथील इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या अंशुमन महेश कोल्हे याने नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात अंशुमनने चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गातून चौथा क्रमांक पटकावत सिंदेवाहीच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला आहे.

         अंशुमनच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई-वडील, शाळेतील शिक्षक तसेच मार्गदर्शक लोकेश गोपाले यांना दिले आहे.

          कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर अंशुमनने हे यश मिळवले असून तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.