Home सांस्कृतिक समर्थ महाविद्यालय लाखनी येथे कंपोस्ट मेकिंग जागरूकता कार्यक्रम…

समर्थ महाविद्यालय लाखनी येथे कंपोस्ट मेकिंग जागरूकता कार्यक्रम…

  चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

          राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथे गृहअर्थशास्त्र विभागाअंतर्गत दिनांक – 14/03/2026 रोज शनिवारला कंपोस्ट मेकिंग जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

         या कार्यक्रमांतर्गत बी.ए. द्वितीय सेमच्या विद्यार्थिनींनी ‘ ओला कचरा सोनं आहे.’ ह्या पथनाट्याच्या माध्यमातून कचरा हे ओझं नाही तर ती संपत्ती आहे, आपण ओला कचरा वेगळा करून त्याचे कंपोस्ट मध्ये रूपांतर केल्यास सेंद्रिय खत तयार करू शकतो व कचरा व्यवस्थापन करून पर्यावरण स्वच्छ राखण्यास मदत करू शकतो. असा मोलाचा संदेश दिला.

          कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य दिगांबर कापसे यांनी विद्यार्थ्यांना कंपोस्ट मेकिंगचे महत्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहअर्थशास्त्र विभागाच्या प्रा. प्रतिभा वंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन नोगेश्वरी मखरे हिने केले. या पथनाट्यामध्ये गौरी पचारे, पुजा वंजारी, प्राची सोनटक्के, जानवी पाखमोडे, रश्मी दिघोरे, सोनम फसाटे, शिया कावळे, प्रियंका बानक, नोगेश्वरी मखरे आणि आकांक्षा कांबळे ह्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

         कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता गृहअर्थशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. स्मिता गजभिये तसेच सर्व महाविद्यालयीन घटकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या.