शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
पळसगांव :- उन्हाळ्यातील मोसमात जंगलात वणवा लावणे पर्यावरणासाठी धोकादायक असून हा एक दखलपात्र गुन्हा असल्याचे मत पळसगांव वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम यांनी व्यक्त केले आहे.
त्या माहिती देताना पुढे म्हणाल्या की पळसगांवसह अनेक भागात वन विभागाने वनवा लावणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करुन दोन वर्षांची शिक्षा व दंडाची कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.कारण वणव्यामुळे जैवविविधता नष्ट होत आहे.
पळसगांव वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम यांनी वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कडक भूमिका घेतली असून जंगल भागात वणवा लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
जंगलांचे संरक्षण करण्यासाठी आग लावणे टाळावे आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करावे,असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम करतं आहेत.वणवा लावणं धोकादायक असल्याने हे टाळा आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करा असेही सुचित केले आहे.



