राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
नागपूर पदवीधर विभागाच्या निवडणूक नोंदणी अभियान सुरू असून जास्तीत जास्त पदवीधरांचि करण्यास प्रोत्साहन द्यावे व नोंदणी करावी या करिता भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे असे आवाहन नागपूरचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे पदवीधर नोंदणी प्रमुख सुधाकरजी कोहळे यांनी केले.
तेकुरखेडा येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजीत पदवीधर नोंदणी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी पदवीधर नोंदणी सहप्रमुख सुधिर दिवे, भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपाचे जेष्ठ नेते गणपत सोनकुसरे ,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव नसरू भामणी, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. देवराव गजबे, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे कोरची तालुकाध्यक्ष सदाराम नरुटी, तालुका नोंदणी प्रमुख प्राध्यापक म्हणून विनोद नागपूरकर, शहर अध्यक्ष तथा स्वच्छता आरोग्य सभापती सागर निरंकारी, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल नुकंठावार, माजी जि प सदस्य गीता कुमरे, जिल्हा सचिव रूपाली कावळे, जयश्री मडावी,कृष्णाजी चंद्रमा, नितीन कुथे अंगराज कराडे, उल्हास देशमुख, ज्येष्ठ नगरसेवक रामभाऊ वैद्य, नगरसेवक अतुल झोडे,रजनीगंधाताई बनसोड, नीलकंठ सयाम ,प्रशांत हटवार, तुषार कुथे , भाग्यवान जनबंधू, राहुल गिरडकर, धर्मा दरवडे, प्रामुख्याने उपस्थित होते.
आगामी काळात होऊ घातलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात पदवीधर नोंदणीचा आढावा घेण्यासाठी कुरखेडा व कोरची तालुक्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी विदर्भ नोंदणी प्रमुख सुधाकर जी कोहळे विदर्भ नोंदणी सहप्रमुख प्रमुख सुधीरजी दिवे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.
बैठकीचे प्रास्तविक भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये बैठकीचे संचालन नोंदणी प्रमुख विनोद नागपूरकर आभार प्रदर्शन रामकृष्ण मुंगणकर यांनी केले.
या बैठकीला ज्ञानेश्वर शेडमाके रमेश बावनथडे , राकेश खुणे, ,सुनिता दखणे चित्रा गजभिये, शितल लांजेवार, रजनी मेश्राम, जगदीश कुमरे, बंटी देवढगले ,संदीप नखाते लोमेश किरसाण व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



