Home Maharashtra छत्रपती संभाजी राजे बलिदान दिनासह जागतिक महिला दिन आणि राजेंद्र बळवंतराव यांचा...

छत्रपती संभाजी राजे बलिदान दिनासह जागतिक महिला दिन आणि राजेंद्र बळवंतराव यांचा 50 वा वाढदिवस,यांचे औचित्य साधून रक्तदान शिबीर संपन्न… — नरशिंहपुर येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद,61 रक्तदात्यांनी केले रक्तदान…‌

   बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी…

        नरसिंहपुर तालुका (इंदापूर) येथील लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीतील नरसिंहराज मंगल कार्यालय या ठिकाणी राजे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन,जागतिक महिला दिन,राजेंद्र बळवंतराव यांचा 50 वा वाढदिवसांचे औचित्य साधून रक्तदान शिबिर उत्स्फूर्त पणे पार पडले.

         या रक्तदान शिबिरात 61 रक्तदानदात्यांनी सहभाग घेतला.तसेच यावेळी महिलांचे रक्तगट तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी महिलांचाही चांगला प्रतिसाद होता.रक्तदात्यास चहा,बिस्किट,केळीचे वाटप करण्यात आले.

          रक्तदान शिबिर प्रसंगी राजेंद्र बळवंतराव बोलत आसताना म्हणाले की,मी आनंद म्हणून हा उपक्रम करीत नाही.परंतु गोरगरीब गरजू आणि गरजवंत अशा रुग्णांसाठी अत्यंत रक्ताची गरज आहे,वेळत त्यांना रक्त मिळत नाही,त्यांच्यासाठी माझी सेवा आहे.

      म्हणूनच माझ्या सहकार्याने ब्लड बँकेच्या मार्फत मोफत रक्त मिळवून देण्यास माझे नेहमीच सहकार्य आसते.कोणत्याही जाती धर्माचा आसो याचा विचार व भेदभाव न करता त्यांना मी रक्त मिळवून देण्यासाठी नेहमीच मदत करीत असतो असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बळवंतराव यांनी रक्तदान शिबिर प्रसंगी केले.

        मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले.प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट,रक्तदान प्रमाणपत्र व पाण्याचा जिआर देण्यात आला.

          नरसिंहराज मंगल कार्यालयात नरसिंहपुर येथे राजेंद्र ज्ञानदेव बळवंतराव व मित्र परिवार यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

        यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे,पंचायत समिती सदस्य शिवाजी मोहिते,प्रशांत शिताप माजी नगरसेवक,देवा मगर शिवसेना शहर प्रमुख,सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे,नरहरी काळे,विलास ताटे,संतोष मोरे,जगदीश सुतार,आनंद काकडे,सचिन कदम,गौरव दंडवते,विजय सरवदे,दत्तात्रय कोळी,रविराज काकडे,नाथाजी मोहिते,आमोलराजे मोहिते,दशरथ राऊत,स्वप्निल लावंड,ओंकार कोळी,बाळू लावंड,ज्योतिषाचार्य राजेश बादले-पाटील, रंगनाथ काकडे,प्रशांत बादले,पराग अवचट,डॉ.अर्जुन शिंदे,डॉ.सुमित्रा कोकाटे,डॉ.सिद्धार्थ सरवदे,आशासेविका अश्विनी देवळे आधी सर्व उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्राचार्य धनंजय दुनाके यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र बळवंतराव यांनी मानले.