प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
नौकरी करताना लालचे अंतर्गत कर्तव्य पार पाडणारे अधिकारी-कर्मचारी आहेतच.महसूल बुडवून स्वत:च्या आर्थीक फायद्याला महत्त्व देणारेही अधिकारी व कर्मचारीही आहेत…
लालचेपोटी शासन-प्रशासनाची होणारी बदनामी झाली तरी चालेल,पण लाच घेतल्याशिवाय कर्तव्य पार पाडायचे नाही असा विडाच,महाराष्ट्र राज्यातील काही अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उचललेला दिसतो आहे.
असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाट तलाठी साझा कार्यक्षेत्रात घडलाय.लालसे अंतर्गत लाचेची मनीषा एवढी रुंदावली की,ट्रॅक्टर मालकांचे अश्रूही त्या लालसे पुढे थिटे पडले.
रात्रो बारा वाजता नंतर,१२ मार्चला एक वाळू भरलेला ट्रॅक्टर रात्रो एक ते दिड वाजताच्या दरम्यान जांभुळघाट येथे भिसी ला जाणाऱ्या महामार्गावरील मोडवर पकडला आणि त्या पटवारी सह त्यांच्यासोबत असलेल्यां इसमांच्या मनात उत्तम कर्तव्यापेक्षा मोठ्या प्रमाणात लालसा निर्माण झाली असल्याचे घटनाक्रमावरुन दिसून येतय…
१२ मार्चच्या रात्रोला वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडल्या नंतर ते ट्रॅक्टर सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोली झाली.शेवटी ती बोली ६० हजार रुपयांवर थांबली…
ट्रॅक्टर मालकाची ६० हजार रुपये देणारी कुवत नसल्यामुळे तो त्यांच्या पुढे ओक्साबोक्शी रडलाय.पण ज्यांच्या मनात कर्तव्य नाही,त्यांच्या मनात लालसेपोटी जागृत झालेले आक्राळविक्राळ राक्षस,रुपये घेतल्या शिवाय शांत थोडी ना होणार होते? शेवटी ६० हजार रुपयांच्या तडजोडी नंतरच वाळू भरलेला ट्रॅक्टर सोडण्यात आल्याचे मनमोहक प्रकरण घडले.
प्रशासनाला बदनाम करणारे महाभाग योग्य कर्तव्य पार पाडत नसल्याने,त्यांच्या नौकरीचा शासनाला काय उपयोग? हा प्रश्न अधिकच कर्तव्याची परिभाषा रेखाटतो आहे.
मात्र,त्या तडजोडी अंतर्गत परत तिन इसम होते असे घटनाक्रमाचे वास्तव आहे.ते इसम कोण? खाजगी की,सरकारी नोकरदार!… हा मुद्दा अधिकच चिंतेची तिव्रता वाढवतो आहे.
स्वत:च्या उत्तम कर्तव्यापेक्षा लाचेचे कर्तव्य भरभरुन देणारे असल्याने,अवैध वाळू उपसा करणेवालांना रात्रीबेरात्री रंगेहात पकडले पाहिजे आणि मनमानी मर्जीनुसार रुपये घेतले पाहिजे,हा नवीन फंडा भ्रष्ट्राचाराला अधिकच चालना देतो आहे.
स्वत:चे उत्तम कर्तव्य पार पाडण्यासाठी कर्तव्याची जाणीव नसलेल्या अशा भ्रष्ट्र कर्मचाऱ्यांची शासन-प्रशासनाला काय गरज?….
मात्र वाळू भरलेले ट्रॅक्टर सोडणारे व ६० हाजर रुपयांची लाच घेणारे कोण? ते सर्व चेहरे समोर कोण आणणार?



